संजय शिरसाटांचं ‘ट्विट पे ट्विस्ट’ आता म्हणाताय….मी एकनाथ शिंदेसोबत होतो

आमदार संजय शिरसाठांनी उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या ट्विटवरून वावटळ उठलं होतं आता मात्र, त्यांनी यु टर्न घेतला असून ते ट्विट मोबाईच्या टेक्निकल प्रॅाम्बेल झालं.

    औरंगाबाद : आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंबद्दल काल एक ट्विट केलं होतं ज्याची आतापर्यंत जोरदार चर्चा होत आहे. त्यावरून शिरसाट पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंसोबत जाणार की काय असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत आहे. या ट्विस्ट मात्र आता स्वत: संजय शिरसाठांनी प्रतिक्रिया दिली असून “मी एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) होतो, आहे आणि त्यांच्याच सोबत राहणार आहे. का झालेलं ‘ते’ ट्विट मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेममुळे झालं”, असं म्हण्टलंय.

    संजय शिरसाठ यांनी आपल्या ट्विट मधून उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख केलेला आहे. मात्र, आता त्यांनी यु टर्न घेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आमचे कुटुंब प्रमुख होते आता नाहीत, असंही म्हण्टलं आहे.तसेच उद्धव ठाकरे यांचं विधानसभेतलं एक भाषण ही त्यांनी त्या ट्विटला जोडलेलं आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे दिलेलं वचन आम्ही पाळतोच आणि दिलेला शब्द हा खरा करून दाखवतोच, असे म्हणताना दिसत आहेत. तर संजय शिरसाट यांची अलीकडेच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागलेली नाहीये. त्यामुळे संजय शिरसाठ यांना मंत्रिपदाचे वचन मिळालं होतं का? आणि ते वचन पूर्ण झालं नाही, म्हणून शिरसाठ यांचे हे संकेत आहेत का? असा सवाल उपस्थित करणार हे ट्विट आहे. मात्र काही वेळातच त्यांनी हे ट्विट डिलीटही केलं.

    मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचं भाषण ट्वीट करत शिंदे गटाला इशारा तर दिला नाही ना अशी आता चर्चा सुरु झाली होती. मंत्रीपद मिळालं नसल्याने शिरसाट नाराज असल्याची चर्चा देखील सुरु आहे. या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली.