sapna choudhary

‘दीप ज्योत ग्रुप’च्या वतीने सपना चौधरीच्या (Sapna Choudhary) गाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजित करण्यात आलं होतं. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे काही दिवसांपूर्वीच अपघाती निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना या कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमात सुरुवातीला दोन मिनिटं स्तब्ध उभं राहून सर्वांनी मेटे यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर काही वेळाने ‘तेरे आखो का ये काजल’ या प्रसिद्ध गाण्यावर सपनाने ठुमके लगावले.

    बीड : कोरोना आणि लॉकडाऊननंतर दोन वर्षांनी बीड (Beed) जिल्ह्यात यंदा दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला. हरयाणामधील गायिका सपना चौधरी यांच्या कार्यक्रमाचं आयोजन दहीहंडीनिमित्त (Dahi Handi 2022) करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये सपना चौधरी यांना पाहण्यासाठी बीडकरांची गर्दी गोळा झाली होती.

    ‘दीप ज्योत ग्रुप’च्या वतीने सपना चौधरीच्या गाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजित करण्यात आलं होतं. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे काही दिवसांपूर्वीच अपघाती निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना या कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमात सुरुवातीला दोन मिनिटं स्तब्ध उभं राहून सर्वांनी मेटे यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर काही वेळाने ‘तेरे आखो का ये काजल’ या प्रसिद्ध गाण्यावर सपनाने ठुमके लगावले, बीडकरांनी या गाण्याला दादा दिल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे तरुणांनी या कार्यक्रमाला मोठी गर्दी केलेली असतानाच दुसरीकडे या कार्यक्रमाच्या आयोजनावरुन अनेकांनी नाराजीही व्यक्त केली आहे.