अवैधरित्या पिस्तुल बाळगणारा सराईत गुन्हेगार जेरबंद, पर्वती पोलिसांची कारवाई; एक पिस्तुल जप्त

बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पर्वती पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून देशी पिस्टल व एक काडतूस असा एकूण ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    पुणे : बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पर्वती पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून देशी पिस्टल व एक काडतूस असा एकूण ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि.१३) लक्ष्मीनगर येथे करण्यात आली आहे.

    साहिल हनिफ पटेल (वय २१ रा. आंबेडकर वसाहत, पर्वती) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, अमित सुर्वे, दयानंद तेलंगे, प्रकाश मरगजे, नवनाथ भोसले, पुरुषोत्तम गुन्ला, किशोर वळे, अनिस तांबोळी, अमोल दबडे, प्रशांत शिंदे, अमित चिव्हे, प्रमोद भोसले, सद्दाम शेख, ज्ञानेश्वर चिंदे यांच्या पथकाने केली.

    साहिल हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर पर्वती व बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, धारदार शस्त्र बाळगणे, जबरी चोरी, चोरी, दंगा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान पाहिजे व फरार आरोपीची माहिती काढली जात आहे. त्यासोबतच वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी हद्दीत गस्त व पेट्रोलिंग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

    दरम्यान पर्वती पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार कुंदन शिंदे व परुषोत्तम गुन्ला यांना माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार साहिल पटेल याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल असून, तो लक्ष्मीनगर येथील सार्वजनिक शौचालयाच्या बोळीत संशयास्पदरित्या थांबला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता देशी बनावटीचे पिस्टल आणि एक काडतूस पोलिसांना मिळाले. पोलिसांनी ३५ हजार ७०० रुपयांचे पिस्टल आणि काडतुस जप्त केले आहे. त्याने हे पिस्टल कशासाठी व कोणाकडुन घेतले. तसेच याचा वापर यापूर्वी केला आहे का, त्याचे इतर कोण साथीदार आहेत का, याचा तपास पोलीस करीत आहेत.