लोकनियुक्त सरपंच जितेंद्र भोसले राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

शक्य तिथे बंधारे, जाळीचे बंधारे, तळ्यांचे खोलीकरण, मोठ्या प्रमाणावर झाडे लावून केलेल्या कामाची महती प्रत्यक्ष भेट देऊन पाहिली पाहिजे. टीसीएलचा योग्य वापर झाला नाही. तर पाणी शुद्ध होण्याऐवजी अपायकारक ठरते, हे लक्षात आल्याने विहिरीत पाईपलाईनला योग्य प्रमाणात ऍटोमॅटिक क्लोरीन मिळणारे मशीन जोडून खर्चाची बचत आणि अगदी शुद्ध पाणी पुरवठा करून गावाच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.

    वडूज : जलसंधारणासाठी ‘एक आदर्श नागझरी पॅटर्न’ निर्माण करून नागझरी गावचे लोकनियुक्त आदर्श सरपंच जितेंद्र भोसले (Jitendra Bhosale) यांनी २५ वर्षाचं योगदान यशस्वी केलं आहे. त्यांच्या सामाजिक व पर्यावरण क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय पर्यावरण संस्थेच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या हस्ते संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष देवा तांबे, सचिव दिपक काळे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत राळेगणसिद्धी (ता.पारनेर) येथील राष्ट्रीय अधिवेशन व पुरस्कार सोहळा कार्यक्रमात जितेंद्र भोसले यांना राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

    यावेळी संस्थेचे राज्यातील, जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
    नागझरी (ता.कोरेगाव जि.सातारा) येथील लोकनियुक्त सरपंच आणि सरपंच परिषद पुण्याचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले यांच्या नेतृत्वाखाली व नागझरी ग्रामस्थांच्या सहयोगाने गावात ४०सिमेंट बंधारे, २०० माती बंधारे, ३५ जाळी बंधारे, ४ पाझर तलाव, १५०० एकर डीप सीसीटी अशी जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर करून तब्बल एक टीएमसी पाणीसाठा करण्यात आला आहे.

    खऱ्या अर्थाने पाणीदार गाव झाले. प्रचंड पाणीसाठा असल्याने या बागायती गावात २५ हजार टनांपर्यंत ऊसाचे तर कोट्यवधी रुपयांचे आले पिकांचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. शक्य तिथे बंधारे, जाळीचे बंधारे, तळ्यांचे खोलीकरण, मोठ्या प्रमाणावर झाडे लावून केलेल्या कामाची महती प्रत्यक्ष भेट देऊन पाहिली पाहिजे. टीसीएलचा योग्य वापर झाला नाही. तर पाणी शुद्ध होण्याऐवजी अपायकारक ठरते, हे लक्षात आल्याने विहिरीत पाईपलाईनला योग्य प्रमाणात ऍटोमॅटिक क्लोरीन मिळणारे मशीन जोडून खर्चाची बचत आणि अगदी शुद्ध पाणी पुरवठा करून गावाच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.