सासवड नगरपरिषदेची आरक्षण सोडत जाहीर पण ‘कहीं खुशी, कहीं गम’

सासवड नगरपरिषद (Saswad Municipal Council) सार्वत्रिक निवडणूक २०२२ नगरपालिका सदस्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जिल्हाधिकारी (पुनर्वसन) उत्तम पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर झाली. सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी प्रभागाची संख्या सदस्यसंख्या आरक्षण सोडत पद्धत व प्रभागाची व्याप्ती याबाबत सविस्तर माहिती दिली.

  सासवड : सासवड नगरपरिषद (Saswad Municipal Council) सार्वत्रिक निवडणूक २०२२ नगरपालिका सदस्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जिल्हाधिकारी (पुनर्वसन) उत्तम पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर झाली. सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी प्रभागाची संख्या सदस्यसंख्या आरक्षण सोडत पद्धत व प्रभागाची व्याप्ती याबाबत सविस्तर माहिती दिली.

  आरक्षण सोडतीसाठी सासवड नगरपरिषदेच्या इंदिरा गांधी विद्यालयातील श्रावणी सुनील शितकल, विश्वजित आप्पा भांडवलकर यांच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली. अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी सोडत विश्वजित आप्पा भांडवलकर यांच्या हस्ते काढण्यात आली. त्याने प्रभाग ४ ची चिठ्ठी काढली. जिल्हा अधिकारी उत्तम पाटील यांनी अनुसूचित जाती महिलासाठी प्रभाग क्रमांक ४ अ व प्रभाग क्रमांक ४ ब हा सर्वसाधारण व प्रभाग क्रमांक ३ अ हा अनुसूचित प्रभाग क्रमांक ३ ब सर्वसाधारण महिलांसाठी व इतर सर्व प्रभागात एक महिला व एक पुरुष असल्याचे जाहीर केले.

  या जाहीर केलेल्या सोडतीबाबत हरकती सूचना असल्यास १५-६-२०२२ ते २१-६-२०२२ पर्यंत सासवड नगरपरिषदेच्या कार्यालय येथे सादर करण्याबाबत मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी सूचना केली.

  सोडत, प्रभाग क्रमांक पुढीलप्रमाणे…

  प्रभाग १) अ सर्वसाधारण महिला
  १) ब सर्वसाधारण
  प्रभाग क्र २) २ अ सर्वसाधारण महिला
  २) ब सर्वसाधारण
  प्रभाग क्र ३) अ अनुसूचित जाती सर्वसाधारण
  ३) ब सर्वसाधारण महिला

  प्रभाग क्र ४) अ अनुसूचित जाती महिला
  ४) ब सर्वसाधारण
  प्रभाग क्र ५) अ सर्वसाधारण महिला
  ५) ब सर्वसाधारण

  प्रभाग क्र ६) अ सर्वसाधारण महिला
  ६) ब सर्वसाधारण
  प्रभाग क्र ७) अ सर्वसाधारण महिला
  ७) ब सर्वसाधारण

  प्रभाग क्र ८) अ सर्वसाधारण महिला
  ८) ब सर्वसाधारण
  प्रभाग क्र ९) अ सर्वसाधारण महिला
  ९) ब सर्वसाधारण
  प्रभाग क्र १०) अ सर्वसाधारण महिला
  १०) ब सर्वसाधारण

  प्रभाग क्र ११) अ सर्वसाधारण महिला
  ११) ब सर्वसाधारण
  प्रभाग क्र १२) अ सर्वसाधारण महिला
  १२) ब सर्वसाधारण
  प्रभाग क्र १३) अ सर्वसाधारण महिला
  १३) ब सर्वसाधारण
  प्रभाग क्र १४) अ सर्वसाधारण महिला
  १४) ब सर्वसाधारण

  प्रभाग क्र. १५) अ सर्वसाधारण महिला
  १५) ब सर्वसाधारण
  प्रभाग क्र. १६) अ सर्वसाधारण महिला
  १६) ब सर्वसाधारण

  प्रभाग क्र. १७) अ सर्वसाधारण महिला
  १७) ब सर्वसाधारण
  प्रभाग क्र. १८) अ सर्वसाधारण महिला
  १८)ब सर्वसाधारण
  प्रभाग क्र. १९) अ सर्वसाधारण महिला
  १९) ब सर्वसाधारण

  प्रभाग क्र २०) अ सर्वसाधारण महिला
  २०) ब सर्वसाधारण

  प्रभाग क्र २१) अ सर्वसाधारण महिला
  २१) ब सर्वसाधारण
  अशा प्रकारे प्रभागाची सोडत काढण्यात आली आहे