सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला १३८ कोटींचा करोत्तर नफा : नितीन पाटील

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला २०२१-२२ या आर्थिक वर्षाअखेर १३८ कोटी १७ लाख रुपयांचा करोत्तर नफा झाला आहे. बँकेचा निव्वळ नफा हा ६७ कोटी रुपये असून, राखीव निधीसाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला २०२१-२२ या आर्थिक वर्षाअखेर १३८ कोटी १७ लाख रुपयांचा करोत्तर नफा झाला आहे. बँकेचा निव्वळ नफा हा ६७ कोटी रुपये असून, राखीव निधीसाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे, संचालक शिवेंद्रसिंहराजे भोसले, दत्ता नाना ढमाळ इत्यादी यावेळी उपस्थित होते.

  नितीन पाटील पुढे म्हणाले, यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये बँकेने १६३ कोटी ७० लाख रुपयांचा करपूर्व नफा मिळवला यामध्ये २५ कोटी ५२ लाख रुपयांचा आयकर भरलेला आहे. म्हणजे करोत्तर नफा १३८ कोटी १७ लाख रुपये इतका झाला आहे.

  बँकेकडे ९,१२२ कोटी तीन लाख रुपयांच्या ठेवी असून, पाच हजार ११२ कोटी रुपयांची कर्जे आहेत. बँकेचा संमिश्र व्यवसाय १४२३४ कोटी ८४ लाख रुपये झाला आहे.

  बँकेच्या स्वनिधीमध्ये ८९ कोटी रुपये इतकी भरीव वाढ झाली असून, बँकेचे स्वनिधी एकूण ७३९ कोटीचे आहेत.

  रिझर्व बँकेच्या सूचनेप्रमाणे सरकारी कर्जरोखे आणि बँकांमध्ये सुरक्षित गुंतवणूक पाच हजार १९४ कोटी रुपये ३२ लाख इतकी जिल्हा बँकेने केली आहे. बँकेची अनुत्पादक कर्जे दहा कोटी ४ लाख असून एकूण कर्जाची हे प्रमाण शून्य पॉईंट वीस टक्के इतके आहे.