
सातारा जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट साडेतीन टक्क्यांवर पोहोचला असून, जिल्ह्यामध्ये ७५ अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण (Subhash Chavan) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
सातारा : सातारा जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट साडेतीन टक्क्यांवर पोहोचला असून, जिल्ह्यामध्ये ७५ अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण (Subhash Chavan) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे आणि वारंवार हात धुणे इत्यादी उपायांचा विसर नागरिकांनी पडू देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आगमन झाले असून, जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सध्या लोणंद नगरीमध्ये स्थिरावली आहे. अशा पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला. मंगळवारी पेशंटची संख्या पंधरा होती. तर बुधवारी ती वाढून 26 वर पोहोचली आहे. बरेच रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये असून, त्यांची प्रकृती उत्तम आहे. तरीही नागरिकांनी फार गाफील न राहता चुकूनही शंका आल्यास तातडीने टेस्ट करून घ्यावी, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी सांगितले.
जर साथीचा संसर्ग वाढलाच तर 14 बेडचे दोन वार्ड आणि अतिदक्षता कक्षामध्ये 10 बेड असे एकूण 38 बॅड या रुग्णांसाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये वाईवरून आलेल्या 75 वर्षीय एका वृद्धेचा मृत्यू झाला. ही वृद्ध असल्यामुळे शरीर प्रक्रियेत गुंतागूंत निर्माण होऊन त्या वृद्धेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टर चव्हाण यांनी सांगितले.