राज्यात विधान परिषदेच्या सात जागांच्या निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी, सतेज पाटील, भाई जगतापांना पुन्हा संधीची शक्यता, रामदास कदमांचा मात्र पत्ता कट

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आठ सदस्यांची मुदत १ जानेवारी २०२२ रोजी संपणार आहे. या रिक्त जागांची निवडणूकही निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. यासाठी १६ नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल आणि १० डिसेंबरला मतदान होणार आहे. या आठपैकी दोनो जागा मुंबईतील आहेत. सध्या या जागांवर रामदास कदम आणि भाई जगताप हे आमदार होते. नव्या नावांत शिवसेनेकडून रामदास कमांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. भाई जगतापांना मात्र काँग्रेसकडून पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.

  मंबई- विधानसभा मतदारसंघातून विधान परिषदेवर जाणाऱ्या एका तर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून जाणाऱ्या सहा जागांसाठीच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. निवडणुका होणाऱअया सातही जागांपैका एकही जागा राष्ट्रवादीकडे नाही. विधानसभा मतदारसंघातील परिषदेची जागा काँग्रेसकडे होती. तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना, भाजपा आणि काँग्रेसकडे प्रत्येकी दोन दोन जागा आहेत.

  भाजपा गुप्त मतदानाचा फायदा घेण्याच्या तयारीत

  काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या एका जागेची पोटनिवडणूक जाहीर झाली असून, या जागेवर काँग्रेसचाच दावा महाविकास आघाडीला मान्यच असेल. विधानसभेच्या २८८ आमदारांनी मिळून एक उमेंदवार निवडून द्यायचा असल्याने, ज्या उमेदवाराला किमान २४५ मते मिळतील तो उमेदवार विजयी होईल. राज्यसभेप्रमाणेच ही निवडणूकही बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असेल तर या निवडमुकीतील गुप्त मतदानाचा फायदा घेऊन भाजपाला आघाडीच्या मतांमध्ये फाटाफूट दाखवण्याची संधी असेल.

  काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठांनी यासाठी आपला हक्क पक्षाकडे संगितला आहे, याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. १६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची तारीख आहे. तर भाजपानेही या निवडणुकीबाबत भूमिका स्प्ष्ट केलेली नाही. भाजपाने उमेदवार दिला तर २९ नोव्हेंबरला विधानसभेतील सर्व सदस्यांना विधानसभेत मतदानासाठी यावे लागणार आहे. आघाडीची काही मते फुटली तर ती सरकारसाठी धोक्याची घंटा मानण्यात येईल. भाजपा काय भूमिका घेणार, हे येत्या काही दिवसांत होणाऱ्या बैठकीनंतर स्पष्ट होईल.

  स्थानिक स्वराज्य संस्थेसाठीही चुरस

  स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आठ सदस्यांची मुदत १ जानेवारी २०२२ रोजी संपणार आहे. या रिक्त जागांची निवडणूकही निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. यासाठी १६ नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल आणि १० डिसेंबरला मतदान होणार आहे. या आठपैकी दोनो जागा मुंबईतील आहेत. सध्या या जागांवर रामदास कदम आणि भाई जगताप हे आमदार होते. नव्या नावांत शिवसेनेकडून रामदास कमांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. भाई जगतापांना मात्र काँग्रेसकडून पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.

  इतर जागांमध्ये काँग्रेसचे राज्यमंत्री सतेज पाटील यांची जागा रिक्त होत असल्याने त्यांनाच पुन्हा संधी मिळणार हे निश्चित मानण्यात येते आहे. धुळे नंदूराबरमध्येही भाजपाकडून पुन्हा अमरिश पटेलांनाच संधी मिळेल अशी शक्यता आहे. अकोला-बुलढाणा मतदारसंघातून शिवसेनेचे गोपीचंद बाजोरिया हे निवृत्त होतायेत तर नागपुरातूनिरीश व्यास निवृत्त होत हेत. या दोन ठिकाणी पक्षांकडून नवे चेहरे दिले जाण्याची शक्यता आहे.

  दोन जागांची निवडणूक लांबणीवर

  याशिवाय सोलापूरचे अपक्ष भाजपा समर्पित आमदार प्रशांत परिचारक आणि नगरचे राष्ट्रवादीचे अरुणकाका जगताप या दोन सदस्यांची मुदतही १ जानेवारीला संपते आहे. मात्र तिथे लगेच निवडणुका होणार नाहीत. ज्या जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांमध्ये ७५ टक्के सदस्य हे मतदानास पात्र असतात, तिथेच या निवडणुका होऊ शकतात. नगर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि शिर्डी नगर पंचायतीची मुदत डिसेंबरमध्येच संपत असल्याने मतदारांची संख्या ७५ टक्के होत नाहीये, त्यामुळे इथे मतदान तूर्तास होणार नाही. तर सोलापुरातही मोहोळ आणि माळशिरस ग्रामपंचायतींचे रुपांतर नगरपालिकेत झाल्याने जिल्हा परिषदेतील गट आणि गणांची संख्या घटल्याचे समोर आले आहे. त्यामुळे इथेही लगेच मतदान होणार नाही.