Kām̐grēsa umēdavārācā parābhava najarēpuḍhē disū lāgalyānē satēja pāṭīla vēḍē jhālē; śivasēnā śindē gaṭa jil'hādhyakṣa rājēkhāna jamādāra yān̄cī bōcarī ṭīkā candagaḍacyā mēḷāvyāta satēja pāṭīla yān̄cyāvara ghaṇāghatī ṭīkā candagaḍa: Khāsadāra san̄jaya maṇḍalika yān̄cā vijaya niścita asalyāmuḷē kām̐grēsacē nētē satēja pāṭīla yān̄cā tōla suṭalā āhē. Tyān̄cyā tōṇḍātūna gaṭāragaṅgā vāhū lāgalī āhē. Tyānnā māhita asāvē kī, khāsadāra san̄jaya maṇḍalika svataḥcyāca gharāta jhōpatāta. Kadhī kuṇā naṭīcyā nādālā lāgalēlē nāhīta. Mhaṇūna tyān̄cā sansāra ṭikūna āhē. Aśī bōcarī ṭīkā śivasēnēcē jil'hādhyakṣa rājēkhāna jamādāra yānnī kēlī āhē. Candagaḍa yēthīla mahāyutīcyā mēḷāvyāta jamādāra bōlata hōtē.Jil'hā upasaṅghaṭaka ḍŏ nāmadēva niṭṭurakara va upatālukāpramukha sau.Sujātā kumbhāra yānnī manōgata vyakta kēlē. Jamādāra mhaṇālē,"kām̐grēsa umēdavāra śāhū mahārāja yān̄cyā pracāra sabhānta bōlatānā āmadāra satēja pāṭīla yānnī pracārācī pātaḷī sōḍalī āhē. Kām̐grēsa umēdavārācā parābhava najarēpuḍhē disū lāgalyānē tē sairabhaira jhālē āhēta. Tyātūnaca san̄jaya maṇḍalika yān̄cyāvara pātaḷī sōḍūna ṭīkā karū lāgalē āhēta. Ātā tyān̄cyā jhōpaṇyāvarahī ṭikā surū āhē. Yākaḍē lakṣa vēdhata rājēkhāna jamādāra mhaṇālē, "āmacē khāsadāra svataḥcyāca gharāta jhōpatāta. Kadhī kuṇā naṭīcyā nādālā lāgalēlē nāhīta. Mhaṇūna tyān̄cā sansāra ṭikūna rāhilēlā āhē. Anēka nivaḍaṇukāta khāsadāra san̄jaya maṇḍalika yān̄cā pāṭhimbā satēja pāṭīla ghētalā. Tyāmuḷē tyānnā vividha sansthāta yaśa miḷālē āhē. Yaśācē sagaḷē śrēya lāṭaṇyāta satēja pāṭīla māhīra āhēta. Maṇḍalikān̄cā pāṭhimbā ghēvūna miḷālēlyā vijayācā gulāla āpalyā aṅgāvara ṭākūna ghēṇyāta tyān̄cā kōṇī hāta dharū śakata nāhī. Anēka nivaḍaṇūkātīla vijayāta san̄jaya maṇḍalika yān̄cā khārīcā vāṭā āhē. Ēvaḍhīhī kr̥tajñatā satēja pāṭīla yān̄cyākaḍē nāhī." Jil'hādhyakṣa jamādāra mhaṇālē, gr̥harājyamantrī asatānā 2014 sālī vidhānasabhēcī nivaḍaṇūka jhālī. Yā nivaḍaṇūkīta amala mahāḍīka yān̄cyā sārakhyā navakhyā umēdavārānē tyānnā parābhava kēlā. Tyānantara tē itakē kapaṭīkārasthāna, pātāḷayantrī, māyāvī bōlaṇārē āṇi viśvāsa ghātakī jhālē āhēta kī, janatētūna nivaḍaṇūka laḍhavaṇyācē dhāḍasa tyān̄cyāta uralēlē nāhī. Mhaṇūna pāṭhīmāgacyā dārānē vidhāna pariṣadēvara nivaḍūna gēlē." Yāvēḷī yaśōvardhana maṇḍalika, upajil'hā pramukha bābū nēsarakara,yuvā sēnā tālukā pramukha gajānana gāvaḍē, vāhatūka sēnā tālukā pramukha salīma mullā,śiva udyōga sēnā tālukā pramukha suśānta naukuḍakara, śivasēnā candagaḍa tālukā saciva avināśa pāṭīla,upatālukāpramukha nāmadēva sāvanta, yuvā sēnā upatālukāpramukha kailāsa bōkaḍē,manōhara pāṭīla, vibhāga pramukha anila gāvaḍē, kēdārī nivagīrē, yallāpā pāṭīla, sambhājī pāṭīla,bāḷū kaḍōlakara,pappu gāvaḍē, śrīkānta subhēdāra upasthita hōtē. Śāhū mahārājān̄cā ghētalā rājakīya baḷī kām̐grēsa hāya kamāṇḍanē kōl'hāpūracī umēdavārī satēja pāṭīla yānnāca dilī hōtī. Paṇa āpaṇa janatētūna nivaḍūna yēṇāra nāhī hē pakkē māhita asalēlyā satēja pāṭalānnī umēdavārīcī māḷa 77 varṣācyā śāhū mahārājān̄cyā gaḷyāta ghālūna mahārājān̄cā rājakīya baḷī dēṇyācē pātaka kēlē āhē. Aśī ṭīkā rājēkhāna jamādāra yānnī kēlī. Show more 2,645 / 5,000 Translation results Translation result Satej Patil went mad as the defeat of the Congress candidate was in sight; Shiv Sena Shinde Group district president Rajekhan Jamadar criticized

  चंदगड : खासदार संजय मंडलिक यांचा विजय निश्चित असल्यामुळे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा तोल सुटला आहे. त्यांच्या तोंडातून गटारगंगा वाहू लागली आहे. त्यांना माहित असावे की, खासदार संजय मंडलिक स्वतःच्याच घरात झोपतात. कधी कुणा नटीच्या नादाला लागलेले नाहीत. म्हणून त्यांचा संसार टिकून आहे. अशी बोचरी टीका शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी केली आहे.
  सतेज पाटील यांनी प्रचाराची पातळी सोडली
  चंदगड येथील महायुतीच्या मेळाव्यात जमादार बोलत होते. जिल्हा उपसंघटक डॉ नामदेव निट्टुरकर व उपतालुकाप्रमुख सौ.सुजाता कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. जमादार म्हणाले,”काँग्रेस उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचार सभांत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी प्रचाराची पातळी सोडली आहे. काँग्रेस उमेदवाराचा पराभव नजरेपुढे  दिसू लागल्याने ते सैरभैर झाले आहेत. त्यातूनच संजय मंडलिक यांच्यावर पातळी सोडून टीका करू लागले आहेत. आता त्यांच्या  झोपण्यावरही टिका सुरू आहे.
  आमचे खासदार स्वतःच्याच घरात झोपतात
  याकडे लक्ष वेधत राजेखान जमादार म्हणाले, “आमचे खासदार स्वतःच्याच घरात झोपतात. कधी  कुणा नटीच्या नादाला लागलेले नाहीत. म्हणून त्यांचा संसार टिकून राहिलेला आहे. अनेक निवडणुकात खासदार संजय मंडलिक यांचा पाठिंबा सतेज पाटील घेतला. त्यामुळे त्यांना विविध संस्थात यश मिळाले आहे. यशाचे सगळे श्रेय लाटण्यात सतेज पाटील माहीर आहेत. मंडलिकांचा पाठिंबा घेऊन मिळालेल्या विजयाचा गुलाल आपल्या अंगावर टाकून घेण्यात त्यांचा कोणी हात धरू शकत नाही. अनेक निवडणूकातील विजयात संजय मंडलिक यांचा खारीचा वाटा आहे. एवढीही कृतज्ञता सतेज पाटील यांच्याकडे नाही.”
  जिल्हाध्यक्ष जमादार म्हणाले,
  गृहराज्यमंत्री असताना २०१४ साली विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत अमल महाडीक यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला. त्यानंतर ते इतके कपटी कारस्थान, पाताळयंत्री, मायावी बोलणारे आणि विश्वास घातकी झाले आहेत की, जनतेतून निवडणूक लढवण्याचे धाडस त्यांच्यात उरलेले नाही. म्हणून पाठीमागच्या दाराने विधान परिषदेवर निवडून गेले.”
  यावेळी यशोवर्धन  मंडलिक, उपजिल्हा प्रमुख बाबू नेसरकर,युवा सेना तालुका प्रमुख गजानन गावडे , वाहतूक सेना तालुका प्रमुख सलीम मुल्ला,शिव उद्योग सेना तालुका प्रमुख सुशांत नौकुडकर, शिवसेना  चंदगड तालुका सचिव अविनाश पाटील,उपतालुकाप्रमुख नामदेव सावंत, युवा सेना उपतालुकाप्रमुख कैलास बोकडे,मनोहर पाटील, विभाग प्रमुख अनिल गावडे, केदारी निवगीरे, यल्लापा पाटील, संभाजी पाटील,बाळू कडोलकर,पप्पु गावडे, श्रीकांत सुभेदार उपस्थित होते.
  शाहू महाराजांचा घेतला राजकीय बळी
  काँग्रेस हाय कमांडने कोल्हापूरची उमेदवारी सतेज पाटील यांनाच दिली होती. पण आपण जनतेतून निवडून येणार नाही हे पक्के माहित असलेल्या सतेज पाटलांनी उमेदवारीची माळ ७७ वर्षाच्या शाहू महाराजांच्या गळ्यात घालून महाराजांचा राजकीय बळी देण्याचे पातक केले आहे. अशी टीका राजेखान जमादार यांनी केली.