चिकोत्रा पूर्ण क्षमतेने भरल्याचे समाधान : समरजितसिंह घाटगे

राजे फाउंडेशनने केलेला यशस्वी प्रयोग

    कागल: गत वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी कमी पाऊस होऊनही सेनापती कापशी विभागास वरदयीनी ठरणारे चिकोत्रा धरण  ९५ टक्के म्हणजे जवळपास १०० टक्के भरल्याचे समाधान आहे. अशी प्रतिक्रिया शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे.
    प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे,गतवर्षी ९ ऑक्टोबर २०२२अखेर २२९६ मिलीमीटर पाऊस झालेला होता.त्यावेळी हे धरण १०० टक्के भरले होते.परंतु चालू वर्षी वरील तारखेला १९९७  मिलिमीटर म्हणजे कमी  पाउस होऊनही धरण ९५ टक्के म्हणजे जवळपास १०० टक्के भरले  आहे.म्हणजेच  यावर्षी कमी पाऊस होऊनही धरण भरण्यास आरळगुंडीच्या पठारावर राजे फाउंडेशनच्या माध्यमातून मारलेल्या चरींचा व घातलेल्या बांधाचा प्रयोग यशस्वी झाला आहे. असे  घाटगे यांनी म्हंटले आहे.
    या धरणाची पाणी साठवणूक क्षमता१.५२ टीएमसी आहे. सन २००० साली हे धरण बांधून पूर्ण झाले. परंतु  एक-दोन वेळचा अपवाद वगळता  हे धरण कधीही १०० टक्के भरले नव्हते. त्यासाठी कोणी प्रयत्नही केलेले नव्हते. सन २०१८ साली  मा देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री असताना शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत आमच्या जलयुक्त शिवारचे अध्यक्ष उमेश देसाई यांच्या संकल्पनेनुसार  त्यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या व कापशी भागातील  कार्यकर्त्यांच्या समवेत म्हातारी  व आरळगुंडी पठाराची पाहणी केली. राजे फाउंडेशनच्या माध्यमातून या दोन्ही पठारावरील वाया जाणारे पावसाचे पाणी छोटे बंधारे घालून मोठ्या चरीद्वारे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वळवले. २०१९ साली हा प्रयोग यशस्वी  झाला. त्यावेळी पासून सलग पाच वर्ष हे धरण १०० टक्के भरत आहे.याचे पूर्ण समाधान आहे. त्यामुळे चिकोत्रा खोऱ्यातील शेतीसह पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.व  टँकरमुक्त होण्यासही मदत झाली आहे.
     शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हीच आमच्या कामाची ऊर्जा…
    चिकोत्रा धरण भरण्यासाठी राजे फाउंडेशनमार्फत केलेले.प्रयत्न यशस्वी झाल्याचे परिसरातील नागरिक ,शेतकरी ज्यावेळी समाधानाने बोलून दाखवतात.  हीच आमच्या कामाची ऊर्जा असून भविष्यात अत्यंत कमी पर्जन्यमान झाले तरी  हे धरण पूर्ण क्षमतेने  भरावे यासाठी  राजे फाऊंडेशनच्या माध्यमातून आणखी दोन बंधारे बांधणे व धरणाची उंची वाढवणे यासाठी प्रयत्नशील आहोत.