गायरान जमीन घोटाळ्यावर सत्तारांचे स्पष्टीकरण; नियमांनुसारच जमिनींचं वाटप, उच्च न्यायालय देईल तो निर्णय मान्य

वाशिममधील गायरान जमीन घोटाळा प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभा सभागृहात केली होती. दरम्यान, गायरान जमीन घोटाळ्याच्या आरोपावर आज हिवाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी अब्दुल सत्तार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

    नागपूर : हिवाळी अधिवेशनात (Winter Session) आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली आहे. त्यातच विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांना सीमाप्रश्नासह घोटाळ्यांवरून चांगलेच धारेवर धरले. यामध्ये कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना विशेष लक्ष्य केल्याचे दिसते. मात्र, त्यांनी आज खुलासा करत आरोप करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले.

    वाशिममधील गायरान जमीन घोटाळा (Land Scam) प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभा सभागृहात केली होती. दरम्यान, गायरान जमीन घोटाळ्याच्या आरोपावर आज हिवाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी अब्दुल सत्तार यांनी स्पष्टीकरण (Explanation) दिले आहे.

    नियमांनुसार जमीनीच वाटप केले असल्याचे सत्तार यांनी स्पष्ट केले. तसेच, अपवादात्मक परिस्थितीत जमीन देता येते, अशी माहितीही सत्तार यांनी दिली. सत्तार यांनी विधानसभेत गायरान जमीन घोटाळ्यासंदर्भात त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर निवेदन सादर केले. नियमांनुसारच जमिनींचे वाटप करण्यात आले असून कोणताही घोटाळा झालेला नसल्याचा दावा त्यांनी केला. उच्च न्यायालय या प्रकरणी जो निर्णय देईल, तो मला मान्य असेल, असेही सत्तार यांनी सांगितले.