सत्यजित तांबे हे आमचे उमेदवार, ‘पदवीधर’साठी आमदार कपिल पाटील यांचा पाठिंबा

शिक्षक लोकभारती संघटना कपिल पाटील यांची असून संघटनेचा पाठिंबा सत्यजित पाठिंबा मिळाला. त्यामुळे तांबेंना पाठबळ वाढले असून नाशिक पदवीधर निवडणूक आणखीनच रंगतदार होईल अशी आशा आहे. आजच्या पत्रकार परिषदेत सुधीर तांबे हे कपिल पाटील यांच्यासोबत दिसले आहेत. त्यामुळे सुधीर तांबेंच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाल्याची चर्चा आहे.

  नाशिक – शिक्षक लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांनी सत्यजित तांबेंना पाठिंबा दिला आहे. आज सुधीर तांबे यांनी कपिल पाटील यांची भेट घेतली होती. त्यात त्यांनी सत्यजीत तांबेंना पाठिंबा द्यावा अशी विनंती केली होती. या बैठकीत सुधीर तांबे हे कपिल पाटील यांच्यासोबत सहभागी होते.

  प्रश्न तडीस नेणार

  सत्यजित तांबे म्हणाले, माझे वडील सुधी तांबे यांनी सभागृहात शिक्षकांसाठी आवाज उठवला. शिक्षकांच्या प्रश्नावर विधानसभेत चर्चा होते. परंतु आकडे मोठे दिसले की, अर्थमंत्री घाबरून जातात. पण देशातील तीन राज्यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवले. येणाऱ्या काळात प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न आम्ही करू. येत्या काळात आपल्याला एकत्र राहून काम करावे लागणार आहे. सरकारवर दबावगट निर्माण करावा लागणार आहे. खांद्याला खांदा लावून उभे राहू. जिथे बोलवाल तिथे येऊ. वडील सुधीर तांबेंच्या मागे जी ताकद लावली ती ताकद माझ्यासाठी लावा. कपिल पाटील यांनी मला पाठिंबा दिला त्यांचे आभार मानतो. मी वचन देतो. कुठलाही प्रश्न असो आणि कुणाविरुद्धही भांडण्याची वेळ आली तर भांडेल.

  सुधीर तांबेंच्या प्रयत्नांना यश
  शिक्षक लोकभारती संघटना कपिल पाटील यांची असून संघटनेचा पाठिंबा सत्यजित पाठिंबा मिळाला. त्यामुळे तांबेंना पाठबळ वाढले असून नाशिक पदवीधर निवडणूक आणखीनच रंगतदार होईल अशी आशा आहे. आजच्या पत्रकार परिषदेत सुधीर तांबे हे कपिल पाटील यांच्यासोबत दिसले आहेत. त्यामुळे सुधीर तांबेंच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाल्याची चर्चा आहे.

  काय म्हणाले कपिल पाटील ?
  -सत्यजित तांबे हे अत्यंत अभ्यासू आणि चांगलं नेतृत्व असलेलं व्यक्तिमत्व
  – डॉक्टर सुधीर तांबे वंचित शोषितांचा प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या सोबत राहिले
  – स्वतः डॉक्टर तांबे यांच्या मागे लागलो की सत्यजित तांबे यांना पुढे येऊ द्या
  – सत्यजितने उमेदवारी स्वीकारली
  – आम्ही एकमताने निर्णय घेतला की सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीचा पुरस्कार करायचा
  – उमेदवारीचा घोळ कुणी घातला, कशासाठी घातला हे मी बोलणार नाही
  – त्यांनी सत्यजित तांबे यांना उमेदवारी दिली असती, तर आणखी चांगलं झालं असत
  – सत्यजित तांबे हे आमचे उमेदवार
  – सत्यजित आणि डॉ. तांबे यांच्या घरात पुरोगामित्वाचा वारसा
  – नेते एकमेकांना रोज भेटतात, राजकारण वेगळं व्यक्तिगत संबंध वेगळे
  – मी स्वतः सर्व पक्षीय नेत्यांना भेटतो