सत्यजीत तांबेंचा घोळ नाना पटोलेंमुळं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना बदला; काँग्रेस नेते आशिष देशमुखांचे थेट मल्लिकार्जुन खर्गेंना पत्र

राज्यातील सत्यजीत तांबेंनी केलेली बंडखोरी, तसेच हा घोळ होण्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जबाबदार असल्याचं नागपुरातील काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी म्हटलं आहे. तसेच देशमुख यांनी थेट काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी त्यांनी पत्रातून केली आहे.

    नागपूर– काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचं पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. सध्या राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांचे वारे आहे. तसेच नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघात शेवटच्या क्षणी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देणारे महाराष्ट्र् प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे (Satyjeet Tambe) यांनी अर्ज दाखल केला आहे, त्यामुळं काँग्रेसमध्ये (Congress) समन्वय नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

    प्रदेशाध्यक्ष बदला…

    दरम्यान, राज्यातील सत्यजीत तांबेंनी केलेली बंडखोरी, तसेच हा घोळ होण्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) जबाबदार असल्याचं नागपुरातील काँग्रेस नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh ) यांनी म्हटलं आहे. तसेच देशमुख यांनी थेट काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी त्यांनी पत्रातून केली आहे. काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्र पाठवून राज्यातील सावळा गोंधळ याचा आढावा मांडणारं पत्र लिहिले आहे. तसेच या पत्रातून नाराजी व्यक्त केली आहे.

    ताबेंच्या घोळाला पटोले जबाबदार…

    नाशिकच्या जागेसाठी काँग्रेसनं सत्यजीत तांबे यांचे वडील आ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र अखेरच्या क्षणी सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. मात्र त्याच वेळी सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. भाजपाच्या निर्देशानुसारच त्यांनी हा अर्ज दाखल करण्यात आल्याचं मानण्यात येतंय. पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या शिस्तपालन समितीनं सत्यजित तांबे यांच्या निलंबनाची शिफारस प्रदेश काँग्रेसकडे केली आहे. तर अर्ज दाखल केला नाही म्हणून सुधीर तांबेवर आधीच निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. येत्या दोन दिवसांत त्यांच्यावरही कारवाई होईल असे मानण्यात येतेय. मात्र हा घोळाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जबाबदार असल्याचं देशमुख यांनी पत्रातून म्हटलंय.

    कारवाईपूर्वीच सत्यजीत तांबेंचा काँग्रेसला रामराम?

    तर कारवाईची वाट न पाहता सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसपासून दूर होण्याचे संकेत दिलेत. त्यांच्या  ट्विटर आणि फेसबुकवरुन त्यांनी काँग्रेस पक्षाचे नावा हटवून टाकले आहे. त्यांच्या कव्हर पेजवर ‘वारशानं संधी मिळते, परंतु कर्तुत्व सिद्ध करावं लागतं’ हे वाक्यही दिसतंय. सत्यजित तांबे आता अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात असले तरी त्यांना या निवडणुकीत भाजपा पाठिंबा देईल अशी चर्चा आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपानं एकाही उमेदवाराला एबी फॉर्म दिला नव्हता हे विशेष.

    सत्यजित तांबे यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा

    गेल्या काही दिवसांपूर्वी सत्यजित तांबे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आले होते. तेव्हापासून त्यांच्यातील जवळीक वाढल्याची चर्चा होती. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर नगरच्या राजकारणातही भाजपाचं वर्चस्व गेल्या काही काळात वाढलेलं आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि विखे यांच्यात नगर जिल्ह्यांत राजकीय संघर्ष आहे. सत्यजित तांबे हे बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. आता सत्यजित तांबे यांनाच भाजपात ओढून नगर जिल्ह्याच्या राजकारणातही उलथापालथ घडवण्याचा निर्णय भाजपानं घेतलेला दिसतो आहे. येत्या काळात तांबे हे भाजपात प्रवेश करतील अशीही चर्चा आहे. प. महाराष्ट्रात नगर हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या जिल्हा मानण्यात येतो. तिथं भाजपानं विखेंनंतर तांबेंना गळाला लावून मोठं यश मिळवल्याचं मानण्यात येतंय.