
आज दुपारी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसकडून नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या बैठकीसाठी उपस्थित होते. सत्यजीत तांबे यांनी यापूर्वीच देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांचे नाव घेतले होते.
मुंबई : नाशिक विभाग पदवीधर विधान परिषदेच्या (Nashik MLC Election) निवडणुकीत बंडखोरी केल्याबद्दल अखेर प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे यांचं पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबन Satyajit Tambe Suspended) करण्यात आलं आहे. तसं पत्र काँग्रेसकडून देण्यात आलं आहे.
या पत्रामध्ये तांबे यांना उद्देशून म्हटलं आहे की, नाशिक विभाग पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीत आपण बंडखोरी करुन अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. आपले हे कृत्य पक्षशिस्तीचे उल्लंघन करणारे असल्याने मा. प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटेले यांच्या आदेशावरून आपल्याला सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात येत आहे. काँग्रेसचे संघटन व प्रशासन सरचिटणीस देवानंद पवार यांच्या सहीने हे पत्र देण्यात आले आहे.
आज दुपारी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसकडून नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या बैठकीसाठी उपस्थित होते. सत्यजित तांबे यांनी यापूर्वीच देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांचे नाव घेतले होते. त्यामुळे महाविकास आघाडीने भूमिका जाहीर केली. खाजगी भूमिका कुणाची नाही असेही गोंधळाची स्थिती असलेल्या जागेबद्दल स्पष्ट केले आहे. दरम्यान, यावेळी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सत्यजित तांबे यांच्याबाबत भाजपनेही भूमिका जाहीर करावी असे आवाहन केले होते. तसेच सत्यजित तांबे यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आल्याचे म्हंटले आहे.आता या निलंबनाबातचे पत्र तांबे यांना पाठवण्यात आले आहे. यावर अद्याप सत्यजित तांबे यांची प्रतिक्रिया आलेली नाही. भाजपनेही याबाबत काहीही सांगितलेले नाही.
हे आहेत उमेदवार
नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक आणि कोकण विभागातील महाविकास आघाडीचे उमेदवार कोण आहेत हे जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये नागपूरमधून सुधाकर अडबाले, अमरावतीमधून धीरज लिंगाडे, औरंगाबादमधून विक्रम काळे, नाशिकमधून शुभांगी पाटील आणि कोकणातून बाळाराम पाटील हे अधिकृत उमेदवार असल्याचे महाविकास आघाडीने जाहीर केले.