सत्यजित तांबेंची ऑडिओ क्लिप व्हायरल, भाजपसोबत जाणार की नाही, याबाबत तांबे स्पष्टच बोलले

जळगाव येथील एका पदवीधर मतदाराने सत्यजीत तांबे यांना फोनवरून हे संभाषण केलेले आहे. व या संभाषणाची ऑडिओ क्लिप आता समाज माध्यमांवर तसेच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. (ऑडिओ क्लिपची पुष्टी नवराष्ट्र करत नाही)

  अहमदनगर – सत्यजित तांबेची (Satyajit Tambe ) ऑडिओ क्लिप ( audio clip ) वायरल व्हायरल झालेली असुन सत्यजीत तांबे यांनी धक्कादायक खुलासे यात केलेले आहेत. मला अपक्ष राहुन राजकारन करायला आवडेल, काँग्रेसचा ab फॉर्म मिळाला नसल्याने अपक्ष अर्ज भरला आहे. पक्षिय राजकारणाच्या पलिकडेच जायचंय, पक्षिय राजकारणात आता आडकाचं नाही. असे सत्यजित तांबे या ऑडिओ क्लिपमध्ये सांगत आहे. जळगाव येथील एका पदवीधर मतदाराने सत्यजीत तांबे यांना फोनवरून हे संभाषण केलेले आहे. व या संभाषणाची ऑडिओ क्लिप आता समाज माध्यमांवर तसेच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. (ऑडिओ क्लिपची पुष्टी नवराष्ट्र करत नाही)

  नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. अशातच या निवडणुकीत अनेक घडामोडी घडत असल्याने नेमके कुणाचा कुणाला पाठिंबा याबाबत संभ्रम आहे. अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे, मात्र सत्यजीत तांबे कोणाच्या बाजूने आहेत? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यामुळेच जळगाव येथील एका पदवीधर मतदाराने उमेदवार सत्यजीत तांबे यांना कॉल करुन याबाबत विचारणा केली आहे.

  -ऑडिओ क्लिपमध्ये काय

  मतदार : दादा नमस्कार
  सत्यजीत तांबे : नमस्ते, बोला दादा
  मतदार : दादा, मी जळगाव येथून सुनील ठाकूर बोलत आहे. दोन दिवसांपासून जे टीव्हीवर पाहतोय, यामुळं परेशान होतो, मागच्या वेळेस बाबांना मतदान केलं, पण आता तुम्ही जो फॉर्म भरला, थोडा इरिटेड झालो मी, मतदार तुमचेच आहे, पक्ष आम्हाला काही माहित नाही, शेवटी एक विषय असा आहे की जो पदवीधरांसाठी लढतो, त्याच्यामागे पदवीधर असतात. सध्या लोकांना एक प्रश्न पडलेला आहे, की जायचं कुठे?
  सत्यजीत तांबे : आपले संबंध पारिवारिक आहेत, एकत्रच राहायचं, प्रश्नच येत नाही काही.
  मतदार : नेमकं तुम्ही कुठं? हे लोकांना सांगायला हवं.
  सत्यजीत तांबे : मी अपक्ष आहे मी काँग्रेसचाच फॉर्म भरला होता मात्र एबी फॉर्म मिळाला नाही म्हणून अपक्ष फॉर्म भरला.
  मतदार : तुमचं एक वेगळं स्थान आहे, ज्याला पक्ष नाही, अलीकडे तुमचे युट्यूबवर असंख्य फॉलोअर्स वाढले. तुमच्या फॉलोअर्सला पक्षच नाही.
  सत्यजीत तांबे : हा पक्ष राजकारणाच्या पलीकडेच काम करायचा आहे मला कुठल्याही राजकारणात अडकायचं नाही मी ठरवलंय आता.
  मतदार : दादा, आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेतच, मात्र तुमची भूमिका जाहीर होत नाही, त्यामुळे थोडा लोकांमध्ये संभ्रम आहे.
  सत्यजीत तांबे : लवकर भूमिका स्पष्ट करु, हे थोडं वादळ शांत होऊ देऊ, मी वादळ शांत व्हायची वाट पाहतोय, वादळात वादळ म्हटलं की गोंधळ होतो सगळं शांत होऊ देऊ मग बोलू आपण दोन दिवसांनी. 19 20 तारखेला बोलू आपण सगळी भूमिका सांगू आपण.

  -ट्विटर, फेसबूकच्या बायोतून पक्षाचे नाव हटवले

  आता सत्यजित तांबे यांनी काँग्रेसपासूनच वेगळे होण्याचे संकेत दिले आहेत. सत्यजित तांबे यांनी आपल्या ट्विटर व फेसबुकवरील बायोमधून काँग्रेस पक्षाचे नाव हटवले आहे. याशिवाय, सत्यजीत तांबे यांच्या फेसबुक आणि ट्विटरच्या कव्हर पेजवर एक संदेश झळकत आहे. ‘वारसाने संधी मिळते, परंतु कर्तृत्व हे सिद्ध करावचं लागतं’ असा सूचक मजकूर या संदेशात आहे. या माध्यमातून काँग्रेसचा आधार न घेता सत्यजित तांबे पदवीधर निवडणुकीसाठी मतदारांना साद घालताना दिसत आहेत.