sharad pawar and saurabh pimpalkar

काही दिवसांपूर्वी समाज माध्‍यमांद्वारे शरद पवार यांना धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी धमकी प्रकरणात पुणे शहरातून सागर बर्वे याला अटक करण्यात आली. तसेच या प्रकरणी अमरावती येथील भाजपा कार्यकर्ते सौरभ पिंपळकर यांचे नाव घेण्‍यात येत होते. अखेरीस आज सौरभ पिंपळकर यांनी आपली भूमिका मांडली.

  अमरावती: शरद पवार धमकी प्रकरणातील (Sharad Pawar Threatening Case) सौरभ पिंपळकर (Saurabh Pimpalkar) अखेर 7 दिवसांनंतर माध्यमांसमोर आले आहेत. शरद पवार धमकी प्रकरणात माझा कुठल्याच प्रकारे हात नसून मला जाणुनबुजुन अडकवण्यात आल्याचा खुलासा सौरभ पिंपळकर यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणात माझा कुठल्याच प्रकारे हात नसून या प्रकरणात मला विनाकारण अडकवण्यात आलं असल्याचं भाजप कार्यकर्ता सौरभ पिंपळकर यांनी म्हटलं आहे.(Amravati News)

  मानहानीचा दावा करणार दाखल
  शरद पवार यांचा दाभोळकर होईल या पोस्टसोबत माझा संबंध नाही, मी त्याला रिट्विट केलं नाही. मी ते शेअर केले नाही आणि लाईक सुद्धा केले नाही. मात्र सुप्रिया सुळे यांनी ते ट्विट माझ्या नावाने दाखवलं व माझ्यावर आरोप केले. त्यामुळे मी आता सुप्रिया सुळे, रोहित पवार, अमोल मिटकरी आणि जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती सौरभ पिंप‌ळकर याने दिली.

  काही दिवसांपूर्वी समाज माध्‍यमांद्वारे शरद पवार यांना धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी धमकी प्रकरणात पुणे शहरातून सागर बर्वे याला अटक करण्यात आली. तसेच या प्रकरणी अमरावती येथील भाजपा कार्यकर्ते सौरभ पिंपळकर यांचे नाव घेण्‍यात येत होते. अखेरीस आज सौरभ पिंपळकर यांनी आपली भूमिका मांडली.

  राष्ट्रवादीचे नेते माफी मागणार का?
  या प्रकरणाचा माझ्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे सुप्रिया सुळे माझ्या आई-वडिलांची आणि पक्षाची माफी मागणार का? असा प्रश्नसुद्धा सौरभ पिंपळकर यांनी विचारला आहे. दुसरीकडे, भाजपाचे माजी नगरसेवक तुषार भारतीय यांनीदेखील राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या नेत्‍यांनी सौरभ पिंपळकर यांच्‍या कुटुंबाची माफी मागितली पाहिजे, असे मत व्‍यक्‍त केले आहे.