सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: विद्यापीठात प्र- कुलगुरूंच्या निवड प्रक्रियेला विलंब

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्र-कुलगुरू (प्रो व्हीसी) पदासाठीची निवड प्रक्रियेला विलंब झाला असुन या पदासाठी रस्सीखेच सुरू असुन सुमारे दीड दोन महिन्यापासून ही निवड प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे या प्रक्रियेतील पारदर्शकता आणि निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विलंबामुळे पक्षपात होऊन प्र कुलगुरूंची निवड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्र-कुलगुरू (प्रो व्हीसी) पदासाठीची निवड प्रक्रियेला विलंब झाला असुन या पदासाठी रस्सीखेच सुरू असुन सुमारे दीड दोन महिन्यापासून ही निवड प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे या प्रक्रियेतील पारदर्शकता आणि निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विलंबामुळे पक्षपात होऊन प्र कुलगुरूंची निवड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्र.कुलगुरुंची (प्रो व्हीसी) निवड हा एक महत्त्वपूर्ण निर्णय असुन जो विद्यापीठाच्या भविष्य कालीन वाटचालीवर आणि विद्यापीठाच्या प्रशासन तसेच शैक्षणिक गुणवत्तेवर लक्षणीय परिणाम करू शकतो. तथापि, प्रदीर्घ निवड प्रक्रियेमुळे प्राध्यापक,अधिसभा सदस्य, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांसह विविध संघटनांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.या निवड प्रक्रियेला विलंब होत असताना, विद्यापीठ समुदाय नवीन प्र कुलगुरूंच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहे. घेतलेल्या निर्णयामुळे केवळ तात्काळ शैक्षणिक परिदृश्यावर परिणाम होणार नाही तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भविष्यातील वाटचालीलाही ते आकार देणार आहे.

    निःपक्षपाती आणि गुणवत्तेवर आधारित निवड व्हावी

    विविध विद्यार्थी आणि शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनांनी व्यक्त केलेल्या प्रमुख चिंतेपैकी एक म्हणजे निवड प्रक्रियेत पक्षपात होण्याची शक्यता आहे. वैयक्तिक प्राधान्य आणि संलग्नता निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकत आहेत असे बोलले जात आहे. तसेच प्र-कुलगुरूंची निःपक्षपाती आणि गुणवत्तेवर आधारित निवड सुनिश्चित करण्यासाठी विद्यापीठाचे नेतृत्व आवश्यक ती पावले उचलत आहे का? असा प्रश्न यातून निर्माण झाला आहे.

    प्र-कुलगुरूंची प्रतिमा स्वच्छ असावी

    सध्याचे कुलगुरूंची प्रतिमा स्वच्छ असुन त्यामुळे त्यांची येणारी नवीन टीम म्हणजे प्र-कुलगुरू व कुलसचिव देखील स्वच्छ व पारदर्शक असावे शिवाय,नवीन निवड होणार्‍या प्र कुलगुरू भ्रष्टाचार किंवा गैरवर्तनाच्या कोणत्याही आरोपांपासून मुक्त असावे. तसेच त्यांचा रेकॉर्ड निर्दोष असण्याची जोरदार मागणी होत आहे. प्र कुलगुरूंची स्वच्छ प्रतिमा असावी आणि कोणत्याही प्रकारच्या आरोपाखाली त्यांचे नाव नसावे. अशी अपेक्षा विद्यापीठ शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनेच्या व विद्यापीठ समुदायाच्या एका वर्गाने व्यक्त केली आहे.