BJP MP Brijbhushan Sharan Singh openly challenged Raj Thackeray

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी विरोध करणारे भोजपुरी भाषेतील एक गाणे आले असून, हे गाणे सोशल मीडियावर प्रचंड धूमाकूळ घालत आहे. “माफी मॉगो राज ठाकरे अगर अयोध्या आना है...कदम रखने नही देंगे यही नेताजीनी थाना है...“माफी मॉगो राज ठाकरे अगर अयोध्या आना है. हे गाणे महेश निर्मोही यांनी गायले आहे, तर योगेश दास शास्त्री यांनी हे गाणे लिहले असून, या गाण्याला बब्बन विष्णु यांनी संगतीबद्ध केलं आहे. सध्या हे गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून, मोठ्या प्रमाणात गाजत आहे.

    मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात हिंदुत्त्वाचा अंगार फुकत, मशिदीवरील अजान बंद झाला नाहीतर मशिदीपुढे हनुमान चालीस पठन करण्याचे आवाहन देशवासियांना केले होते. याचे पडसाद सुद्धा अनेक ठिकाणी पाहयला मिळाले. यूपीत मशिदीवरील भोंगे हटविण्यात आले आहेत, तर मदरशामध्ये राष्ट्रगीत म्हणण्यास अनिवार्य केले आहे. दरम्यान, राज ठाकरेंनी जेव्हापासून हिंदुत्वाच्या मुद्दाला हात घातला आहे, तेव्हापासून ते फार आक्रमक झाले आहेत.

    दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५ जूनला अयोध्या दौरा आहे, यासाठी मनसेकडून जोरदार तयारी सुद्धा करण्यात येत आहे, तर ५ जूनला ११ रेल्वे मनसेकडून बुक करण्यात आल्या आहेत. एकिकडे राज ठाकरे यांची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना, त्यांच्या दौऱ्याला विरोध सुद्धा होत आहे. उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला आहे.

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध होत आहे. भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांनी माफी मागावी अशी मागणी केलीये. या संदर्भातच साधू संतांसोबत एक बैठक घेण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्याचं पाहायला मिळालं. त्यातच आता राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी विरोध करणारे भोजपुरी भाषेतील एक गाणे आले असून, हे गाणे सोशल मीडियावर प्रचंड धूमाकूळ घालत आहे. “माफी माँगो राज ठाकरे अगर अयोध्या आना है…कदम रखने नही देंगे यही नेताजीनी थाना है…“माफी माँगो राज ठाकरे अगर अयोध्या आना है. हे गाणे महेश निर्मोही यांनी गायले आहे, तर योगेश दास शास्त्री यांनी हे गाणे लिहले असून, या गाण्याला बब्बन विष्णु यांनी संगतीबद्ध केलं आहे. सध्या हे गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून, मोठ्या प्रमाणात गाजत आहे.