सोने पॉलिश करून देतो असे सांगून पाच तोळे सोने घेऊन केला पोबारा

गोंदवले खुर्द येथील शिलवंत वस्तीवर सोने पॉलिश करून देतो असे सांगून दोन अनोळखी इसमानी मनीषा बाळकृष्ण शिलवंत, यांचे जवळील पाच तोळे सोने घेऊन पोबारा केला.

    दहिवडी : गोंदवले खुर्द येथील शिलवंत वस्तीवर सोने पॉलिश करून देतो असे सांगून दोन अनोळखी इसमानी मनीषा बाळकृष्ण शिलवंत यांच्या जवळील पाच तोळे सोने घेऊन पोबारा केला. याबाबतची फिर्याद त्यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

    सातारा पंढरपूर रस्त्यावरील गोंदवले खुर्द येथे शिलवंत वस्ती असून गुरुवार सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास लाल रंगाचे मोटार सायकल वरून दोन अज्ञात इसम त्यांचे घरासमोर येऊन थांबले व घरात कोण आहे का अस विचारलं त्यावेळी मनीषा शिलवंत या घरी होत्या त्यांना या अज्ञात इसमानी आम्ही तुमच्याकडे असलेल्या तांब्याच्या तसेच पितळी वस्तू व सोन्याचांदीचे दागिने याना पॉलिश करून देतो असे सांगितले व त्यांच्या कडून खात्रीसाठी एक पितळी तांब्या त्यांच्या कडून मागून घेत त्याला चकचकीत करून पुन्हा त्यांच्याकडे दिला तो तांब्या पाहून त्यांना ही त्या बाबत विश्वास पटला व त्यांनी दुसरी एक जुनी वस्तू पॉलिश करण्यासाठी दिली ती ही वस्तू त्यांनी स्वच्छ करून दिली. त्यानंतर शिलवंत यांनी माझ्याकडे असलेले सोने तुम्ही पॉलिश करून देऊ शकता का अस त्यांना विचारलं. त्यांनी तात्काळ हो म्हणल्यावर त्यांना सोने घेऊन यायला सांगितलं त्यांनी हा लगेच कपाटात ठेवलेले सोने त्यांच्याकडे दिले. सदर इसमांनी हातचलाखी करून पॉलिश करण्यासाठी ते सोने त्यांच्या समोर त्यांनी जवळील भांड्यात टाकले व त्यांना आत जाऊन पाणी आणायला लावत हातचलाखी करत ते सोने काढून घेतले व या मिश्रणातून अर्ध्या तासाने तुमचे सोने पॉलिश होऊन निघेल अस सांगून तिथून त्यांच्या कडून त्या कामाचे पैसे घेत पोबारा केला त्या नंतर अर्ध्या तासाने पाहिले असता त्यामध्ये सोने नव्हते.तेव्हा स्वतःची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्या नंतर त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश आलं नाही.
    दहिवडी पोलिसात दिलेल्या फिर्यादी मध्ये मनिषा शिलवंत यांनी आपले एकूण 5 तोळे वजनाचे 1,88,260/- रु. की. चे सोने फसवून घेऊन गेले म्हणून गुन्हा नोंद केला आहे.