विद्यार्थ्यांनो, टिळा-गंध लावून शाळेत येऊ नकाच ! छत्रपती संभाजीनगरमधील शाळेतील प्रकार; शाळेने तसं पत्रकच काढलं…

अनेक विद्यार्थी शाळेत टिळा-गंध लावून जातात. पण याच प्रकारावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका खासगी शाळेने आक्षेप घेतला. शाळेने विद्यार्थ्यांना टिळा-गंध लावून शाळेत येण्यावर बंदी (School Entry) घातली आहे.

  संभाजीनगर : अनेक विद्यार्थी शाळेत टिळा-गंध लावून जातात. पण याच प्रकारावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका खासगी शाळेने आक्षेप घेतला. शाळेने विद्यार्थ्यांना टिळा-गंध लावून शाळेत येण्यावर बंदी (School Entry) घातली आहे. याबाबत शाळा व्यवस्थापनाने तसे पत्रकच काढले आहे. शाळेच्या या कारभाराविरोधात हिंदू समाज आक्रमक झाला आहे.

  महाराष्ट्र भूषण पब्लिक स्कूलमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. ही शाळा संभाजीनगरच्या बिडकीनमध्ये असून, या शाळेत अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 25 जुलै रोजी शाळा प्रशासनाकडून पालकांना एक पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छतेसहत निटनेटकेपणाने शाळेत पाठविण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. यामध्येच मुलांना कपाळावर कोणत्याही प्रकारचा टिका, रंग, गंध, लावून शाळेत पाठवू नये. हातात, कडे, दोरे, बांधून पाठवू नये. तसेच विद्यार्थ्यांच्या हातात घड्याळ किंवा स्मार्टवॉचही नसावे, असेही सांगण्यात आले आहे.

  पालकांकडून शाळा प्रशासनाला विचारणा

  याबाबतचे पत्रक मिळाल्यानंतर टिळा, गंध लावण्यावरून पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काही पालकांनी शाळेत जाऊन प्रशासनाला विचारणा केली. ही आपली संस्कृती असल्याचे सांगत टिळा, गंध याच्यावर आक्षेप का, असे विचारले.

  शाळा प्रशासनाकडून स्पष्टीकरण…

  अनेक पालकांनी या पत्रकाबाबत शाळा प्रशासनाकडे विचारणा केली. जेव्हा हे पालक शाळेत गेले तेव्हा शाळा प्रशासनाने आपली बाजू स्पष्ट करत सांगितले की, पत्रात फक्त सूचना करण्यात आल्या आहेत. त्या बंधनकारक नसल्याचे शाळेतील शिक्षकांनी सांगितले आहे.