
सोलापुरात अक्कलकोट तालुक्यातील शाळकरी विद्यार्थ्यांनी मैंदर्गी नगर परिषदेच्या सीईओ कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. मैंदर्गी नगर परिषदेने कर भरला नसल्याच्या कारणावरुन जिल्हा परिषदेच्या तीन शाळांना कुलूप ठोकले आहे. ऐन परीक्षेच्या काळात शाळेला कुलूप ठोकल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षक संतप्त झालेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत शाळेतून नगरपरिषदेपर्यंत मोर्चा काढत सीईओच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरु केलं आहे.
सोलापूर: आपली कार्यतत्परता दाखवण्यासाठी अधिकारी बऱ्याच गोष्टी करत असतात. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील नगर परिषदेमधील अधिकाऱ्याने चक्क तीन शाळांना कुलूप (Three School Closed) ठोकलं. त्यानंतर शिक्षकांनी आपला फंडा वापरला. शिक्षकांनी आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची शाळा (Solapur School News) अधिकाऱ्याच्या कार्यालयात भरवली.
सोलापुरात अक्कलकोट तालुक्यातील शाळकरी विद्यार्थ्यांनी मैंदर्गी नगर परिषदेच्या सीईओ कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. मैंदर्गी नगर परिषदेने कर भरला नसल्याच्या कारणावरुन जिल्हा परिषदेच्या तीन शाळांना कुलूप ठोकले आहे. ऐन परीक्षेच्या काळात शाळेला कुलूप ठोकल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षक संतप्त झालेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत शाळेतून नगरपरिषदेपर्यंत मोर्चा काढत सीईओच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरु केलं आहे. जिल्हा परिषदेच्या तीन शाळांनी कर थकवल्याने नगर परिषदेच्या सीईओंनी या कर्तव्य तत्परता तर बजावली. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालं आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण? असा सवाल केला जात आहे.
शाळा सरकारी अन् नगर परिषद सरकारी. दोन विभागाच्या या भांडणाचा भुर्दंड विद्यार्थ्यांना का? असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे या प्रकरणी शाळेला कुलूप ठोकण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
मार्च महिन्यात परीक्षांना सुरुवात होत असते. परीक्षांचा कालावधी जवळ आला असताना शाळेला अचानक कुलूप ठोकून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्यात आलं आहे. अनेक शासकीय कार्यालयांची थकबाकी असते, श्रीमंत व बडे प्रस्थ असलेले लोकही आपली थकबाकी भरत नाहीत. परंतु त्यांच्यांवर कारवाई करण्याची हिंमत अधिकारी दाखवत नाहीत. अधिकाऱ्यांच्या या वागणुकीबद्दल पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश कधी मिळणार? असा प्रश्न पालक आणि शिक्षकांच्या मनात आहे.