दोन वर्षांनंतर वाजली शाळेची घंटा; विद्यार्थ्यांचे भरले वर्ग

तब्बल दोन वर्षांच्या कोरोनाच्या कालखंडानंतर बुधवारी सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शाळा (Primary School) विद्यार्थ्यांनी गजबजल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यात अनेक ठिकाणी उपस्थिती दर्शवून शाळेचा पहिला दिवसाचा आनंद विद्यार्थ्यांनी द्विगुणित केला.

    सातारा : तब्बल दोन वर्षांच्या कोरोनाच्या कालखंडानंतर बुधवारी सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शाळा (Primary School) विद्यार्थ्यांनी गजबजल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यात अनेक ठिकाणी उपस्थिती दर्शवून शाळेचा पहिला दिवसाचा आनंद विद्यार्थ्यांनी द्विगुणित केला. शाळेत ठिकाणी गुरुजनांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ आणि गोड खाऊ देऊन स्वागत केले.

    सातारा जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात 83 शाळा असून, या विविध शाळांमधून सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रातून तीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेले दोन वर्षे कोरोनाच्या संक्रमणामुळे फारच अडचणीची ठरली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले. तर जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये गुरुजनांना विद्यार्थ्यांना अध्यापन करताना फारच अडचणींचा सामना करावा लागला होता. पटसंख्या अगदीच घटल्याने काही अडचणी जाणवल्या होत्या. मात्र, यंदाच्या शैक्षणिक वर्षात पहिल्या दिवशी सातारा जिल्ह्यात सुमारे पंधरा हजार विद्यार्थ्यांनी शाळेत पहिल्या दिवशी उपस्थिती नोंदवण्याचे वृत्त आहे.

    सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या निर्देशानुसार आणि प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी सूचना दिल्याप्रमाणे सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण करून शाळा वेगवेगळ्या माध्यमातून सजवण्यात आल्या आणि विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी गोडी वाटेल, असे वातावरण तयार करण्यात आले.