राज्यात दुर्मिळ ‘स्क्रब टायफस’ आजाराचा शिरकाव, आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर

बुलडाण्यात दुर्मिळ 'स्क्रब टायफस' आजाराचा शिरकाव झाल्याने आता आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. बुलडाण्यात दुर्मिळ 'स्क्रब टायफस' आजाराचा शिरकाव झाल्याने आता आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

    बुलडाणा: गेल्या अडीच वर्षापासून कोरोनाशी लढणाऱ्या आरोग्य यंत्रणेची झोप उडवणारी बातमी आहे. राज्यावरील कोरोनाचं संकट अद्याप टळलं नसताना आता दुर्मिळ स्क्रब टायफस (Scrub Typhus) या आजाराने राज्यात डोकं वर काढलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात या आजाराचे रुग्ण आढळुन आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे.

    स्क्रब टायफस हा आजारा सामन्यत: अफगाणिस्तान, पाकिस्तान, जपान, इंडोनेशिया, रशिया या देशात आढळतो. तर, भारतातील हिमाचल प्रदेशमध्ये वर्षातून एक-दोन रुग्ण आढळतात. मात्र, आता महाराष्ट्रात या आजाराचे रुग्ण आढळ्याने खळबळ उडाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे एक दोन नव्हे तर तब्ब्ल नऊ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर आहे. तसेच खामगाव येथील एका रुग्णाची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने त्याच्यावर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.

    स्क्रब टायफसची लागण कशी होते?

    स्क्रब टायफस हा आजार खरं तर आपल्या देशात अत्यंत दुर्मिळ असा आहे. उंदीर किंवा जंगलातील दाट गवतावरील एका प्रकारचा कीटक चावल्यावर यातील “ओरिएंशिया सुसूगामुशी” नावाचा जिवाणू आपल्या शरीरात गेल्यावर हा आजार होतो. या आजारामुळे मृत्यूचं प्रमाण 30 टक्के असल्याने हा आजार अतिशय घातक असल्याचं म्हटलं जातं. हा जिवाणू शरीरात गेल्यावर जवळपास 8 ते 10 दिवसांनी ताप येणे, अंगावर पुरळ येणे, डोकेदुखी, अंगदुखी अशी लक्षण दिसून येतात. अनेकदा रुग्ण मेंदूत ताप गेल्याने बेशुद्ध होऊन मरण पावतात त्यामुळे हा आजार होऊ किंवा पसरू नये म्हणून आता यंत्रणा कामाला लागली आहे.