पंचायत समितींची कसून तपासणी; १५ आमदारांचे पथक दाखल

जिल्हा परिषद मुख्यालय तपासणी पाठोपाठ पीआरसी कमिटीने पंचायात समिती कारभाराची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. १५ आमदारांचे पथक जिल्ह्यातील ११ पंचायात समितींना भेट देऊन शासकीय नियमांचे अनियमता झाली आहे का? हे तपासण्याचे काम सुरु आहे.

    सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : जिल्हा परिषद मुख्यालय तपासणी पाठोपाठ पीआरसी कमिटीने पंचायत समिती कारभाराची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. १५ आमदारांचे पथक जिल्ह्यातील ११ पंचायात समितींना भेट देऊन शासकीय नियमांचे अनियमता झाली आहे का? हे तपासण्याचे काम सुरु आहे.

    चेअरमन संजय रायमुलकर करमाळा, माढा-कुर्डवाडी पंचायत समितीचा आढावा घेत आहेत. आमदारांचे चार तपासणी गट तयार करण्यात आले आहेत.

    शेखर निकम, रत्नाकर गुटे, कृष्णा गजबे अनिल पाटील (गटप्रमुख) देवराव, सदाभाऊ खोत, किशोर दराडे, प्रदीप जैस्वाल, कैलास पाटील (गटप्रमुख), विजय रहांगडाले, माधवराव पवार, अमरनाथ राजूरकर, किशोर जोरगेवार, सुभाष छोटे (गटप्रमुख), विक्रम काळे, अंबादास दानवे, महादेव जानकर, मेघना बोर्डीकर या आमदारांचा समावेश करण्यात आला आहे. गटप्रमुखांसोबत विभागप्रमुखांची नेमणूक करण्यात आली आहे.

    पीआरसी कमिटीनी जिल्हा परिषद कारभाराची महत्वपूर्ण निरीक्षण बुधवारी नोंदवले आहे. कोणते निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. याबाबत चेअरमन संजय रायमुलकर यांना विचारले असता ते म्हणाले की, साक्ष ही गोपनीय आहे. शुक्रवारी प्राथमिक स्वरुपात माहिती देण्यात येईल.