जळगावात प्लॅस्टिक पिशव्या बनविणारी कंपनी सील

प्लॅस्टिक बॅग मॅक्रोनची जाडी तपासनीसाठी धिकारी मनीष महाजन व ठाकूर यांना बोलवले असता तपासणीदरम्यान सदर प्लास्टिक कॅरीबॅग २५ ते ३० मॅक्रोन जाडीच्या आढळून आल्यात.

    जळगाव – शहारातील एमआयडीसी मधील सेक्टर V ११३ येथील प्लॅस्टिक पिशव्या बनविणारी नेहा इंडस्ट्रीज या कंपनीची अचानक तपासणी केली असता फार मोठ्या प्रमाणात ५० मॅक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या किराणा प्लास्टिक बॅग तयार करतांना आढळून आले. त्यामुळे ही कंपनी सील करण्यात आली. ही कारवाई आयुक्त विद्या गायकवाडसह इतर आधिकारी यांनी केली.

    या प्लॅस्टिक बॅग मॅक्रोनची जाडी तपासनीसाठी धिकारी मनीष महाजन व ठाकूर यांना बोलवले असता तपासणीदरम्यान सदर प्लास्टिक कॅरीबॅग २५ ते ३० मॅक्रोन जाडीच्या आढळून आल्यात. नेहा इंडस्ट्रीजचे मालक पराग लुंकड यांच्यावर दहा हजारांची दंडात्मक कारवाई करत कंपनीला सील करण्यात आले आहे. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड व अधिकारी मनिष महाजन व ठाकूर यांच्या उपस्थीतीत अतिक्रमण विभाग प्रमुख संजय ठाकुर, आरोग्य निरीक्षक जितेंद्र किरंगे व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी वर्गाने ही कारवाई केली.