
जालना जिल्ह्यात मराठा समाजावर (Maratha Community) झालेल्या लाठीचार्जला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जबाबदार आहेत, असा आरोप करून मराठा समाजाच्या संयमाचा अंत शासनाने पाहू नये. अन्यथा मराठा समाज आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार (Prashant Pawar) यांनी बोलताना दिला.
बारामती : जालना जिल्ह्यात मराठा समाजावर (Maratha Community) झालेल्या लाठीचार्जला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जबाबदार आहेत, असा आरोप करून मराठा समाजाच्या संयमाचा अंत शासनाने पाहू नये. अन्यथा मराठा समाज आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार (Prashant Pawar) यांनी बोलताना दिला.
जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सणसर, भवानीनगर या ठिकाणी सर्व व्यापारी दुकाने बंद ठेवून तीव्र निषेध करण्यात आला. त्यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने भवानीनगरमधून मोर्चा काढूननंतर जाहीरसभा झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चास सुरुवात झाली. भवानीनगर येथील व्यापार पेठेत मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. त्यावेळी प्रशांत पवार बोलत होते.
प्रशांत पवार म्हणाले, शांततेच्या मार्गाने मराठा समाज बांधव आंदोलन करत असताना जाणीवपूर्वक त्यांच्यावर लाठीहल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये महिला देखील जखमी झाल्या. या घटनेला उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. त्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.
शासनाने मराठा आरक्षणाबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. हा समाज आतापर्यंत संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहे, मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहू नये, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.