
पोलीसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळत आंदोलकांना ताब्यात
खंडाळा : शिरवळ (ता .खंडाळा) येथील जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचे काम प्रस्तावित ठिकाणी होण्यासाठी शिरवळ ग्रामस्थांनी ग्रामपंचायत समोर दि १२ रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.अखेरीस ३:०० वा.दरम्यान जलजीवन पाणीपुरवठा योजना नियोजित ठिकाणीच करण्याची मागणी करीत अनुप सुर्यवंशी, अजिंक्य कांबळे,इम्रान काझी,गजानन कुडाळकर,गणेश पानसरे,केदार हाडके,हितेश जाधव यांनी पेट्रोल अंगावर ओतून घेवून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलीसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळत आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.
जलजीवन मिशनअंतर्गत शिरवळच्या नळ पाणी पुरवठा योजनेचा प्रशासकीय आदेश सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या आदेशाने 21 डिसेंबर 2022 ला निघाला आहे. त्याचप्रमाणे तांत्रिक मंजूरी 14 डिसेंबर 2022 ला अधिक्षक अभियंता वैशाली आवटे यांच्या आदेशाने मिळाली आहे. या योजनेचे भूमिपूजन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते 8 फेब्रुवारी 2023 रोजी होऊनही निविदेच्या नियोजित जागी अद्यापपर्यंत एकही वीट रचली गेलेली नाही. स्थानिक प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे सदर योजना रद्द व बारगळ्ण्याच्या स्थितीमध्ये आली असून यामागे सातारा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचा डाव असल्याचे आरोप होत आहेत. शिरवळ ता खंडाळा येथील जल जीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या पाणी पुरवठा योजना प्रस्तावित जागी होण्यासाठी शिरवळ मधील ग्रामस्थांनी 12 रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला होता. त्यातबाबत आत्मदहनापासून परावृत्त्त करण्यासाठी शिरवळ ग्रामपंचायत कार्यालयातर्फे आंदोलक व सरपंच, सर्व सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची दि 10 रोजी तात्काळ मीटिंग आयोजित करण्यात आली होती. यावेळी अनेक विषयांवर खडाजंगी चर्चा होऊन या कामाबाबत त्या चर्चे अंती कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी सातारा यांची तात्काळ आजच भेट घेण्याचे ठरले. भेट घेतल्या नंतर देखील यावर कोणत्याही प्रकारचा तोडगा न निघाल्याने अखेर आंदोलकांना आंदोलन करावे लागले यावेळी शिरवळ पोलिसांनी सकाळ पासूनच अग्निशामक वाहन , ॲम्बुलन्स , पाणी टँकर सह चोख बंदोबस्त ठेवला होता .अखेरीस ३:०० वा.दरम्यान जलजीवन पाणीपुरवठा योजना नियोजित ठिकाणीच करण्याची मागणी करीत अनुप सुर्यवंशी, अजिंक्य कांबळे,इम्रान काझी,गजानन कुडाळकर,गणेश पानसरे,केदार हाडके,हितेश जाधव यांनी पेट्रोल अंगावर ओतून घेवूनआत्मदहनाचा प्रयत्न केला . आंदोलन कर्त्यांनी ग्रामपंचायत हाय हाय , सरपंचाचा धीक्कार असो, पाणीपुरवठा योजना नोयोजित जागी झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या.यावेळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमा झाली होती. पोलीसांच्या सतर्कतेमुळे आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी आंदोलकांची भेट घेत जो पर्यंत तोडगा निघत नाही तो पर्यत कोणतेही प्रकारचे जलजीवन मोशन अंतर्गत असलेले काम सुरु होनार नाही अशे आश्वासित केले. आमदार गोरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले कि, मुळातच कार्यकर्त्यांची भूमिका जि पाणी योजना जि मंजूर झालेली आहे ती सुमारे ७२ लाख रुपयांची असून यामध्ये ग्रामपंचायातीच्या मागील सदस्यांनी मंजूर केली आहे. याबाबत राजकीय श्रेयावादासाठी नवीन ठिकाणी करण्याचा जो घात घातला आहे. एवढे मोठा विषय असताना अधिकारी अदेखील मास्त्वान पद्धतीने वागत आहेत. यावर उद्या तत्काळ बैठक लावून यावर मार्ग काढण्यात येईल. इथे मार्ग निघाला नाही तर शासन स्तरावर यावर मार्ग काढला जाईल तसेच भारतीय जनाता पक्षातील कार्यकर्त्याला आंदोलन करायला लागणे हि खूप मोठी गोष्ट असल्याचे देखील यावेळी आ.गोरेनी स्पष्ट केले. या आंदोलनावेळी शिरवळ पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त लावण्यात आला होता .