स्व. जयवंतराव भोसले यांच्या स्मृतिदिनानिमत्त शुक्रवारी व्याख्यान

कृष्णाकाठच्या सहकार, आरोग्य आणि शैक्षणिक विकासाचे प्रणेते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवार दि. ५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० वाजता कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसमधील सभागृहात व्याख्यानाचे आयोजत करण्यात आले आहे.

    कराड : कृष्णाकाठच्या सहकार, आरोग्य आणि शैक्षणिक विकासाचे प्रणेते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवार दि. ५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० वाजता कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसमधील सभागृहात व्याख्यानाचे आयोजत करण्यात आले आहे.

    सहकारमहर्षी जयवंतरावजी भोसले (आप्पा) स्मारक समिती, अतुल भोसले युवा प्रतिष्ठान व कृष्णा उद्योग समूहातील सर्व संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सहकार व ज्येष्ठ नागरिक चळवळीचे पुणे येथील ज्येष्ठ नेते अरुण रोडे यांचे ‘ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व उपाय’ या विषयावर व्याख्यान होणार असून, अध्यक्षस्थानी कराड येथील सुप्रसिद्ध व्यावसायिक सुभाष वाडीलाल शहा असणार आहेत. तसेच य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

    दरम्यान, शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणातील स्व. आप्पांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पार्पण व अभिवादन केले जाणार असून, या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.