‘एक व्होट एक नोट’ या तत्त्वावर  स्वाभिमानी संघटना निवडणूक लढवणार : महेश खराडे

पक्षाने संधी दिल्यास सांगली लोकसभा लढविणार असल्याची घोषणा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली.  सांगली लोकसभा मतदार संघाची निवडणूक स्वाभिमानीच्या वतीने ताकदीने लढविण्याचा निर्धार जिल्हा  बैठकीत करण्यात आला.  ही निवडणूक 'एक व्होट एक नोट' या तत्त्वावर लढविण्याचे ठरविण्यात आले.

    पक्षाने संधी दिल्यास सांगली लोकसभा लढविणार असल्याची घोषणा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली.  सांगली लोकसभा मतदार संघाची निवडणूक स्वाभिमानीच्या वतीने ताकदीने लढविण्याचा निर्धार जिल्हा  बैठकीत करण्यात आला.  ही निवडणूक ‘एक व्होट एक नोट’ या तत्त्वावर लढविण्याचे ठरविण्यात आले.
    ही बैठक आज बुधवारी सांगलीतील सर्किट हाऊस येथे झाली.  अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपट मोरे होते. बैठकीला कार्याध्यक्ष संदीप राजोबा, युवा आघाडीचे संजय बेले, भागवत जाधव बाबा, सांदरे राजेंद्र पाटील, रमेश माळी, शिवाजी पाटील, दामाजी दुबल, राजेंद्र माने, संजय खोळखुंबे, भरत चौगुले,  बाळासाहेब जाधव,  आदी उपस्थित होते.
    या वेळी बोलताना महेश खराडे म्हणाले, “आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी कोणत्याही पक्षाबरोबर आघाडी करणार नाही. माजी खा. राजू शेट्टी यांनी राज्यात सहा लोकसभा लढविण्याची घोषणा केली आहे. त्यात सांगली लोकसभेचा ही समावेश आहे त्यामुळे सांगली लोकसभा ताकदीने निवडणूक लढविण्याचा निर्धार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी केला आहे. आमच्याकडे पैसे नाहीत मात्र आमच्या कार्यकर्त्यांकडे हतीचे बळ आहे. त्याच्या जोरावर एक बोट आणि एक नोट या तत्त्वावर ही निवडणूक लढविली जाईल.