वाईत रामदास कदम यांच्या विरोधात सेनेचे जोडा मारो आंदोलन

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ वाई तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने वाई किसन वीर चौक येथे जोडा मारो आंदोलन करण्यात आले. रामदास कदम याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या विरोधात काही दिवसापूर्वी अपशब्द वापऱ्यालाचा आरोप करत शिवसेना कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रभर आंदोलन सुरू केले आहे.

    वाई : शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ वाई तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने वाई किसन वीर चौक येथे जोडा मारो आंदोलन करण्यात आले.
    रामदास कदम याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या विरोधात काही दिवसापूर्वी अपशब्द वापऱ्यालाचा आरोप करत शिवसेना कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रभर आंदोलन सुरू केले आहे. याची पडसाद ग्रामीण भागातही उमटले आहेत. वाई तालुक्यातील शिवसैनिकांनीही कदम यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत गुरुवारी सकाळी 11 वाजता येथील किसनवीर चौकात कदम यांच्या प्रतिमेला जोडू मारून आंदोलन करतो घोषणाबाजी केली . यावेळी शिवसैनिकांनी ” रामदास कदमाचे करायचे काय खाली डोके वर पाय”, “पन्नास खोके एकदम ओके”, “निम का पत्ता कडवा हे रामदास कदम भडवा हे.” “पन्नास खोके माजलेत बोके”. अशा घोषणा दिल्या.

    यावेळी तालुका प्रमुख अनिल शेंडे, सुरेश चव्हाण. शहर प्रमुख गणेश जाधव,किरण खामकर,विवेक भोसले,संतोष पोफळे,नितीन पानसे,सोमनाथ अवसरे,नितीन गोवंडे,आशिष पाटणे,गौतम यादव,स्वप्नील भिलारे,रुपेश तावरे,महादेव गायकवाड,अतुल भाटे,अशोक खांडजोडे,अमोल पटवर्धन,मिथुन कदम,संदीप जाधव,नितीन सोनवणे,गणेश किर्दत आदी पदाधिकारी शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.

    पराभूत होऊन सुद्धा ज्या उद्धव साहेबानी रामदास कदम ला विधान परिषदेवर घेतला,कॅबीनेट मंत्री पद दिल ज्या मातोश्री च्या ताटात खाल्लं त्याच ताटात विष्टा करण्याचं काम उद्धव साहेबांवर बोलून त्यानं केलं म्हणून शिवसेना वाई शहर व तालुक्याच्या वतीने आम्ही सर्व शिवसैनिक रामदास कदम व शहाजी पाटील चा जाहीर निषेध त्यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करून केला व या पुढे गदारां पैकी जो कोणी उद्धव साहेबांवर खालच्या भाषेत टीका करेल त्याला शिव सैनिक धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही असा निर्धार केला

    - गणेश जाधव, वाई शहर प्रमुख