नव्याने समाविष्ट ३४ गावांसाठी स्वतंत्र दर

महापालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाकडून जाहिरात फलक नियमन व नियंत्रण नियमानुसार जाहिरात फलकांसाठी शुल्क वाढ करण्यात आली आहे. जाहिरात दरवाढ निश्‍चित करताना महापालिकेची जुनी हद्द व २०१७ नंतर झालेली महापालिकेची नवीन हद्द म्हणजेच नव्याने समाविष्ट ३४ गावांसाठी स्वतंत्र दर निश्‍चित केले आहेत.  

    पुणे :   महापालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाकडून जाहिरात फलक नियमन व नियंत्रण नियमानुसार जाहिरात फलकांसाठी शुल्क वाढ करण्यात आली आहे. जाहिरात दरवाढ निश्‍चित करताना महापालिकेची जुनी हद्द व २०१७ नंतर झालेली महापालिकेची नवीन हद्द म्हणजेच नव्याने समाविष्ट ३४ गावांसाठी स्वतंत्र दर निश्‍चित केले आहेत.

    महापालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाकडून जाहिरात फलकांसाठी (होर्डिंग) शुल्क दरवाढ निश्‍चित करण्यात आली आहे. महापालिकेच्या जुन्या हद्दीसाठी प्रथम वर्षासाठी प्रति चौरस फुटासाठी ५८०, दुसऱ्या वर्षासाठी ६४० व तिसऱ्या वर्षासाठी ७०० रुपये दर निश्‍चित केला आहे. तर २०१७ नंतर नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांसह महापालिकेच्या नवीन हद्दीसाठी जाहिरात फलक शुल्काचे दर ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार, पहिल्या वर्षासाठी २९० रुपये, दुसऱ्या वर्षासाठी ३२० रुपये व तिसऱ्या वर्षासाठी ३५० रुपये प्रति चौरस फूट असे दर निश्‍चित करण्यात आले आहेत. जाहिरात फलक नवीन परवानगी व नूतनीकरणासाठी ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती परवाना व आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.