यावल तालुक्यातील किनगाव येथील तीन महिलांचा वेगवेगळ्या घटनेत रुमालाने गळा आवळून खून करून गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन वृद्ध महिलांचा खून झाल्याने किनगाव हादरले होते

    जळगाव : पैसे आणि दागिन्यासाठी तीन वृद्ध महिलांचा खून करणारा सिरीयल किलर मुकुंदा उर्फ बाळू बाबूलाल लोहार (वय 30) याच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखे पथकाने किनगाव येथून मुसक्या आवळल्या आहे. त्याने सर्व गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याला यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

    यावल तालुक्यातील किनगाव येथील तीन महिलांचा वेगवेगळ्या घटनेत रुमालाने गळा आवळून खून करून गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन वृद्ध महिलांचा खून झाल्याने किनगाव हादरले होते. गेल्या पंधरा महिन्यात हे तीन खून करण्यात आले होते. या प्रकरणी तपास सुरू असताना आरोपींनी त्याने आणखी धक्कादायक गुन्ह्याची कबुली दिली. त्याने किनगावातीलच द्वारकाबाई चैत्राम सुरवाडे (वय-७०), रूख्माबाई कडू पाटील (वय-७०) या दोन वृध्द महिलांचा देखील याच पध्दतीने गळ्यात रूमाल आवळून खून केला होता आणि दोघांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरून पसार झाला होता.