नितेश राणेंचे पत्रातून शिवसेनेवर गंभीर आरोप; आदित्यसेनेला बिल्डरांकडून टक्केवारी

महापालिका निवडणूका जवळ आल्या आहेत. त्यामुळे परत सत्ताधारी आदित्यसेनेने मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडणार आणि मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करणार अशा उलटा बोंबा मारणे सुरू केले आहे. परंतु, वास्तविक यांच्या जवळच्याच असलेल्या टक्केवारी मिळवून देणाऱ्या विकासकामुळे मुंबईकर नाईलाजास्तव हद्दपार झाला आहे, असे नितेश राणे यांनी पत्रात म्हटले आहे.

    मुंबई : बिल्डरांकडून मराठी जनतेला वेठीस धरण्यावरुन शिवसेना (Shivsena) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी टीका केली. यासंदर्भात नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र लिहिले आहे. यात ‘आदित्यसेनेला’ (Aadityasena) टक्केवारी मिळवून देणाऱ्या बिल्डरांवर कडक कारवाई करा, असे म्हटले आहे.

    महापालिका निवडणूका जवळ आल्या आहेत. त्यामुळे परत सत्ताधारी आदित्यसेनेने मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडणार आणि मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करणार अशा उलटा बोंबा मारणे सुरू केले आहे. परंतु, वास्तविक यांच्या जवळच्याच असलेल्या टक्केवारी मिळवून देणाऱ्या विकासकामुळे मुंबईकर नाईलाजास्तव हद्दपार झाला आहे, असे नितेश राणे यांनी पत्रात म्हटले आहे.

    पुर्नविकास नियंत्रण नियमावलीअंतर्गत भाडेकरू तथा एसआरएमधील झोपडपट्टीधारक खासगी विकासकांची नेमणूक करतात. या पद्धतीच्या अनेक पुनर्विकास प्रकल्पांमध्ये विकासक एक ते दीड वर्षांचे पर्यायी जागेचे भाडे देणे कबूल करतात. परंतु, अनेक गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये अनेक विकासकांची कामे रखडल्याने त्यांनी भाडेही देणे बंद केले आहे, असे राणे यांनी म्हटले आहे.