eknath shinde and uddhav thackeray

शिवसेनेमधील फाटाफुटीवर शिक्कामोर्तब होत असताना उद्धव ठाकरेंच्या कार्यशैली विरोधातील आमदारांचा असंतोष आणखी उफाळून येत आहे. “उद्धव साहेब कोणत्याही सभागृहात निवडून न येणाऱ्या आणि तुमच्या भोवती वावरणाऱ्या विधान परिषद आणि राज्यसभेतील बडव्यांनीच तुमचा घात केला आहे,” असा खरमरीत जबाब ठाकरेंच्या कालच्या फेसबुक लाईव्ह संदर्भात एका शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार संजय शिरसाट यांनी दिला आहे. ते औरंगाबाद पश्चिम अनुसूचित जाती राखीव मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत(Serious allegations against Uddhav Thackeray from Shiv Sena MLA's Letter).

  मुंबई : शिवसेनेमधील फाटाफुटीवर शिक्कामोर्तब होत असताना उद्धव ठाकरेंच्या कार्यशैली विरोधातील आमदारांचा असंतोष आणखी उफाळून येत आहे. “उद्धव साहेब कोणत्याही सभागृहात निवडून न येणाऱ्या आणि तुमच्या भोवती वावरणाऱ्या विधान परिषद आणि राज्यसभेतील बडव्यांनीच तुमचा घात केला आहे,” असा खरमरीत जबाब ठाकरेंच्या कालच्या फेसबुक लाईव्ह संदर्भात एका शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार संजय शिरसाट यांनी दिला आहे. ते औरंगाबाद पश्चिम अनुसूचित जाती राखीव मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत(Serious allegations against Uddhav Thackeray from Shiv Sena MLA’s Letter).

  आमचे असे हाल होत असताना एकनाथ शिंदे हा एकच दरवाजा आमच्यासाठी सदैव खुला असायचा. मतदारसंघातील वाईट स्थिती, अधिकारी वर्ग, काँग्रेस राष्ट्रवादीकडून होत असलेला अपमान ही सर्व गाऱ्हाणी फक्त शिंदेच ऐकून घेत आणि त्यावर ते लगेच सकारात्मक मार्ग काढत होते, असे त्यांनी पत्रात नमूद केले. शिरसाट यांचे पत्र एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केले.

  तुमच्या भोवतीचे बडवे आम्हा चार लाख लोकांतून निवडून येणाऱ्या आमदारांना तासन् तास खोळंबून ठेवत होतेले, तुमची भेटच होऊ देत नव्हते आणि त्याच वेळी मतदारसंघातील आमचे काँग्रेस व राष्ट्रवादीचे विरोधक तुमच्या बरोबरचे त्यांचे फोटो समाज माध्यमांतून नाचवत होते असे संजय शिरसाट यांनी पत्रात म्हंटले आहे.

  तुम्ही काल ते बोललात ते भावनिक नक्कीच होते पण त्यात आम्ही विचारत असलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर नव्हते, असाही टोला शिरसाट यांनी लगावला. काल वर्षा निवासस्थानाचे दरवाजे सर्वसामान्य जनेतसाठी खुले झाले हे पाहून बरे वाटले. पण आम्ही आमदार म्हणून तिथे तुम्हाला भेटायला यायचो तेव्हा भेट तर सोडाच पण गेटही उघडले जायचे नाही. बाहेरच तासनतास ताटकळत ठेवले जायचे आणि शेवटी कंटाळून आम्ही परत जायचो.

  शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार संजय शिरसाट यांच्या पत्रातील महत्वाचे मुद्दे

  •  मुख्यमंत्री आमदारांना सहाव्या मजल्यावर नेहमी भेटतात, पण तुमच्या बाबतीती तोही प्रश्न नव्हता, कारण तुम्ही कधी सहाव्या मजल्याकडे येतच नव्हता.
  • मतदारसंघातील प्रश्न, अडचणी, निधी, प्रकल्प अशा कामांसाठी तुम्हाला भेटायचे आहे अशी विनवणी पुष्कळ वेळा करावी लागायची. गेटवरच ताटकळत रहावे लागायचे व बडवे तेव्हा फोनही उचलत नसत.
  • अयोध्येला जाताना अपमान केला
  • आदित्य ठाकरेंच्या बरोबर बऱ्याच आमदारांना अयोध्येला जायचे होते. आम्ही काही आमदार विमानतळावर विमानाची वाट पहात होतो, तेव्हा तुम्ही शिंदेंना सांगून आम्हाला तातडीने परत बोलावलेत. आम्ही चेक-इन केलेले सामान परत घेऊन विमानतळावरून परतलो. हा अपमान कशासाठी?
  • राज्यसभेला शिवसेनेचे एकही मत फुटले नसताना परिषदेच्या मतदाना आधी आमदारांना ही वागणूक का दिली गेली?
  • काल तुम्ही बोललात ते अत्यंत भावनिक होते, पण त्यात आमच्या प्रश्नांची उत्तरे कुठे होती? सर्व कठीण प्रसंगात बाळासाहेबांचे व धर्मवीर आनंद दिघेंचे हिंदुत्व जपणाऱ्या शिंदेंनीच आम्हाला मोलाची साथ दिली. त्यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी उघडे होते, आजही आहेत व पुढेही राहतील या विश्वासापोटी आम्ही शिंदेसाहेबां सोबत आहोत.