सीरमचा १०० कोटींचा मानहानीचा दावा; लस, बदनामी करणाऱ्या वक्तव्याबाबत तातडीचा दिलासा नाही

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनाही प्रतिवादींकडून लक्ष्य केल्याचा दावाही कंपनीने केला असून कंपनीशी संबंधित कोणाही विरोधात बदनामीकारक मजकूर किंवा वक्तव्य करण्यापासून अंतरिम दिलासा देण्याची मागणी कंपनीने केली आहे.

    मयुर फडके, मुंबई : सीरम इन्स्टिट्यूटच्या (Serum Institute) कोरोनावरील कोव्हिशिल्ड लस (Covishield Vaccine) तसेच कंपनीविरोधात बदनामीकारक वक्तव्य करण्यापासून संस्था आणि व्यक्तींना रोखण्याची गुरुवारी उच्च न्यायालयाने नकार देत सीरम इन्स्टिट्यूटची मागणी फेटाळून लावली (The Demand Was Rejected) आणि तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला (Denied Immediate Relief).

    कंपनी तसेच लसविरोधात बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या योहान टेंग्रा, अनार्की फॉर फ्रीडम इंडिया संस्था, अंबर कोईरी आणि त्याची अवेकन इंडिया मूव्हमेंट इ. संस्थांविरोधात सीरमने १०० कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा दाखल केला आहे. प्रतिवादींना कंपनी आणि कोव्हिशिल्डविरोधात कोणताही बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करण्यापासून रोखण्याची मागणी केली आहे.

    सिरमच्या अधिकृत संकेतस्थळावरील मजकूर कोणीही कुठल्याही अटीविना पाहू शकतो, असा दावा करताना कोव्हिशिल्ड लशीच्या दुष्परिणामांमुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचा मजकूर प्रतिवादींकडून प्रसिद्ध केला जात असल्याचे कंपनीचे याचिकेत म्हटले आहे.

    कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनाही प्रतिवादींकडून लक्ष्य केल्याचा दावाही कंपनीने केला असून कंपनीशी संबंधित कोणाही विरोधात बदनामीकारक मजकूर किंवा वक्तव्य करण्यापासून अंतरिम दिलासा देण्याची मागणी कंपनीने केली आहे. कंपनीचा दावा फेटाळून लावावा कोव्हिशिल्डच्या परिणामांबाबत चुकीची माहिती दिल्याबाबत कंपनीवर कारवाईचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी प्रतिवादींकडून करण्यात आली आहे.

    सदर प्रकरण मोठे आहे. कागदपत्रे मोठ्या प्रमाणात सादर करण्यात आली आहेत. त्यामुळे कंपनीकडून मागण्यात आलेल्या अंतरिम दिलासासाठी नियमित सुनावणी घेण्यासाठी पुरेसा वेळ नाही, असे न्यायमूर्ती एन. जमादार यांनी आदेशात स्पष्ट केले. तसेच कंपनीला तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला. मात्र तातडीचा दिलासा मिळवण्यासाठी कंपनीला सुट्टीकालीन न्यायालयाकडे दाद मागण्याचे स्वातंत्र्य दिले आणि सुनावणी ३ जानेवारी रोजी निश्चित केली.