पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊन, निवडणूक अर्ज भरणे प्रक्रिया थंडावली; 13 महिलांच्या गळ्यात सरपंचपदाची पडणार माळ

मंगळवेढा तालुक्यातील 27 ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवारी पहिला दिवस होता. त्यानुसार, प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली होती. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्व्हर डाऊन (Server Down) झाल्याने एकही उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकले नसल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.

    मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील 27 ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवारी पहिला दिवस होता. त्यानुसार, प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली होती. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्व्हर डाऊन (Server Down) झाल्याने एकही उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकले नसल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.

    बठाण, चिकलगी, उचेठाण, डिकसळ, रड्डे, आंधळगांव, ब्रम्हपुरी, खुपसंगी, शिरसी, बालाजीनगर-लमाणतांडा (पोटनिवडणूक) यासह इतर गावच्या पंचवार्षिक निवडणुका लागल्या असून, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 16 ते 20 ऑक्टोबरचा कालावधी देण्यात आला आहे. सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यासाठी महसूलची प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली होती.

    यामध्ये 23 टेबल व 46 कर्मचारी, मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, विस्ताराधिकारी यांचा समावेश होता. सकाळी 11.00 ते 3.00 या वेळेत सर्व कर्मचारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रतिक्षेत असताना निवडणूक विभागाचा सर्व्हर डाऊन असल्याने एकही अर्ज दाखल करता आला नाही. उमेदवार कागदांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त होते.

    या सर्व प्रक्रियेवर तहसीलदार मदन जाधव, निवडणूक विभागाचे महसूल सहाय्यक उमाकांत मोरे लक्ष ठेवून होते. या ग्रामपंचायत निवडणुकीत बठाण, चिकलगी येथील आरक्षणामुळे 13 महिलांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडणार आहे.