सचिन वाझेला जामीन मंजूर, मात्र मुक्काम तुरुंगातच…जाणून घ्या कारण

सचिन वाझेनं सीआरपीसी कलम ८८ अंतर्गत जामीनासाठी केलेला अर्ज विशेष न्यायालयाने स्वीकारला आहे. मात्र जामीन मिळूनसुद्धा इतर प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असल्याने, वाझेचा मुक्काम तुरुंगातच राहणार आहे. त्यामुळं जरी वाझेला दिलासा मिळाला असला तरी, वाझेचा मुक्काम कोठडीतच असणार आहे.

    मुंबई : सचिन वाझेला (sachin vaze) मुंबई सत्र न्यायालयाने (Court) दिलासा दिला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. सचिन वाझेनं सीआरपीसी कलम ८८ अंतर्गत जामीनासाठी केलेला अर्ज विशेष न्यायालयाने स्वीकारला आहे. मात्र जामीन मिळूनसुद्धा इतर प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असल्याने, वाझेचा मुक्काम तुरुंगातच राहणार आहे. त्यामुळं जरी वाझेला दिलासा मिळाला असला तरी, वाझेचा मुक्काम कोठडीतच असणार आहे. दरम्यान, जरी सचिन वाझेला मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला असला तरी, सचिन वाझेच्या जामीनाला इडीचा विरोध केला आहे, त्यामुळं इडी पुन्हा याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं समजते.

    काय आहे प्रकरण?

    मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळली. नंतर या गाडीच्या मालकाचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत आढळून आला. मनसुख हिरण  मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस आधिकारी सचिन वाझे यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करण्यात आली होती. तसेच हे प्रकरण मग विधानसभेत विरोधकांनी उचलून धरलं. यात नाव समोर आलं ते एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं. तसेच मनी लाँड्रिंग प्रकरणात देखील वाझेंचं नाव समोर आलं आहे.