Sevagram police take immediate action, arrest three accused in murder

फिर्यादीने भाऊ अरुणकुमार थूल यांच्या घरी जाऊन पाहिले असता बेडरुमध्ये खाली रक्ताच्या थारोळयात पडलेला दिसला. त्याच्या डोक्याला जबर मारहाण झाल्याचे दिसले. त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होते. अज्ञातांनी घरात प्रवेश करून व बेडरूमचा लाकडी दरवाजा तोडून भावाच्या डोक्यावर दारुची शिशी व लाकडी दांडयाने जबर मारहाण करुन जिवानिशी ठार केल्याप्रकरणी सेवाग्राम पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

    वर्धा : करंजी भोगे येथील खून प्रकरणातील तीन आरोपींना सेवाग्राम पोलिसांनी अटक केली आहे. सदर गुन्ह्याची तत्काळ दखल गुन्हे शाखेने घेऊन गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी अजय सुनील शेंडे (वय ३०), रोशन सुनील शेंडे (वय २८) रा. भैसारे ले – आऊट कामठवाडा सेवाग्राम, गौरव गोविंद कापटे (वय २५) रा. नागमंदिरजवळ वरुड यास सेवाग्राम येथून ताब्यात घेतले.

    याबाबत फिर्यादी सिद्धार्थ दमडू थूल (वय ५८) रा. करंजी भोगे हे त्यांच्या घरी असतांना ६ जुलै २०२२ रोजी रात्री अंदाजे १०.३० वाजताच्या दरम्यान, मौजा करंजी (भोगे) येथील माजी पोलिस पाटील धनराज बलवर यांनी फिर्यादीला फोनद्वारे माहिती दिली की, त्यांचा भाऊ अरुणकुमार थुल याला कोणीतरी अज्ञात इसमांनी त्याच्या डोक्यावर जबर मारहाण करून जिवानिशी ठार केले.

    फिर्यादीने भाऊ अरुणकुमार थूल यांच्या घरी जाऊन पाहिले असता घरातील बेडरुमध्ये खाली रक्ताच्या थारोळयात पडलेला दिसला. त्याच्या डोक्याला जबर मारहाण झाल्याचे व डोक्याला गंभीर जखम असल्याचे दिसले. त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होते. अज्ञातांनी घरात प्रवेश करून व बेडरूमचा लाकडी दरवाजा तोडून भावाच्या डोक्यावर दारुची शिशी व लाकडी दांडयाने जबर मारहाण करुन जिवानिशी ठार केल्याप्रकरणी सेवाग्राम पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तीन आरोपींना अटक केली आहे.

    सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक नीलेश ब्राम्हणे यांच्या निर्देशाप्रमाणे पोउनि राहुल ईटेकार, हरिदास काकड, गजानन कठाणे, पवन झाडे, अभय इंगळे यांनी केली.