साधु मारहाण प्रकरणातील सात आरोपींना आज जत न्यायालयात हजर केले जाणार

कर्नाटकातील साधूंना सांगलीमध्ये (Sangali Sadhu) साधू मारहाण प्रकरणी करण्यात आली होती. या प्रकरणी लवंगा गावातील एकूण 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आहे. तर, सरपंच पुत्र आणि माजी सरपंचालाही एकूण सात जणांना आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे

    सांगली : सांगली तालुक्यातील लंवगा येथे घडलेल्या साधू मारहाण प्रकरणी माहिती समोर येत आहे. कर्नाटकातून देवदर्शासाठी महाराष्ट्रात आलेल्या साधूना काही जणांनी मुलं चोरण्याच्या टोळीतले आहे समजून मारहाण केली होती. या प्रकरणी अटकेत असलेल्या 7 आरोपींना आज जत न्यायालयात हजर केले जाणार आहे.

    कर्नाटकातील साधूंना सांगलीमध्ये (Sangali Sadhu) साधू मारहाण प्रकरणी करण्यात आली होती. या प्रकरणी लवंगा गावातील एकूण 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आहे. तर, सरपंच पुत्र आणि माजी सरपंचालाही एकूण सात जणांना आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे. तर, पोलिसांकडून पुन्हा साधूंचा जबाब नोंदवला जाणार आहे.

    नेमकं काय झालं?

    उत्तर प्रदेशचे चार साधू कर्नाटकात देवदर्शनासाठी जात होते. या दरम्यान त्यांनी मार्गाबद्दल स्थानिकांना विचारणा केली. त्याची भाषा ही न कळल्याने लोकांना त्यांच्यावर संशय आला. मुलं चोरणारी टोळी समजून चौघांनाही गाडीतून ओढून काठीनं, पट्ट्यानं मारहाण करण्यात आली. यावेळी आम्ही साधू असल्याचं वारंवार चौघांकडून सांगितलं जात होतं. पण संतप्त जमावानं त्यांचं काहीही न ऐकून घेता मारहाण सुरुच ठेवली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांकडून तातडीनं कारवाई करून नागरिकाच्या तावडीतून साधूंना सोडवण्यात आलं. यावेळी आम्ही साधू असल्याचं वारंवार चौघांकडून सांगितलं जात होतं. पण संतप्त जमावानं त्यांचं काहीही न ऐकून घेता मारहाण सुरुच ठेवली होती. मारहाणीनंतर साधूंनी तक्रार देण्यास नकार दिला