वसतिगृह चालकाकडून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; नाशिक पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

नाशिकमधील एका निवासी वसतिगृहात धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या मानेनगर परिसरातील एका निवासी वसतिगृहाच्या संचालकाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची माहिती मिळत आहे.

    नाशिक : नाशिकमधील एका निवासी वसतिगृहात धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या मानेनगर परिसरातील एका निवासी वसतिगृहाच्या संचालकाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची माहिती मिळत आहे.

    आश्रमात बेघर आणि गरीब कुटुंबातील ३० पेक्षा अधिक मुली वास्तव्यास आहेत. याच निवासी वसतिगृहामध्ये राहणाऱ्या शाळकरी मुलीवर संचालकाने अत्याचार केल्याचा आरोप मुलीने केला आहे. मुलीच्या फिर्यादीवरून म्हसरुळ पोलीस स्टेशनमध्ये मध्यरातील गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयताच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत माने नगर आहे. त्या ठिकाणी एका रो हाऊसमध्ये हॉस्टेल उभारण्यात आले आहे. तिथे मुलं मुली राहत होते, मात्र मुलांची व्यवस्था वेगळ्या ठिकाणी होती. येथील मुलींना तिथे अनेक दिवसापासून त्रास दिला जात असल्याची चर्चा आहे आणि त्यात एका अल्पवयीन मुलीवर तिथल्या संचालकांनी अत्याचार केल्याची माहिती समोर येत आहे.

    दरम्यान पोलिसांना घटनेची माहिती मिळताच संशयित हर्षल बाळकृष्ण मोरे यास ताब्यात घेतले आहे. त्याला आता कोर्टात हजर देखील करण्यात आले आहे. मात्र पोलिसांकडून अद्याप या प्रकरणाचा कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात संशयता विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे अंजनेरी येथील घटनेला एक दिवस पूर्ण होत नाहीत तोच आधार आश्रमातील ही दुसरी धक्कादायक घटना समोर आल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.