
लग्नाचे आमिष दाखवून गेल्या चार वर्षांपासून शारीरीक संबंध निर्माण केले. लग्नाचा बहाणा करुन तिच्याकडून १ लाख रुपये देखील घेतले. पण, तिच्याशी लग्न न करता दुसऱ्याच मुलीशी साखरपुडा उरकून घेतला. हा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे.
पुणे : लग्नाचे आमिष दाखवून गेल्या चार वर्षांपासून शारीरीक संबंध निर्माण केले. लग्नाचा बहाणा करुन तिच्याकडून १ लाख रुपये देखील घेतले. पण, तिच्याशी लग्न न करता दुसऱ्याच मुलीशी साखरपुडा उरकून घेतला. तरुणी जाब विचारण्यास गेल्यानंतर त्याच्या घरच्यांनी शुभमचा नाद सोडून दे असे म्हणत प्रकरण नाही मिटवले तर धडा शिकवील, अशी धमकीही दिली. याप्रकरणी एका २३ वर्षाच्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार, शुभम पायगुडे, रोहित पायगुडे, अनिल पायगुडे, संगीता पायगुडे, बाळासाहेब पायगुडे (सर्व रा. आगळंब, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार जुलै २०१९ पासून सुरु होता. चार वर्षांपुर्वी त्यांच्या ओळख झाली होती. ओळखीनंतर त्याने लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर त्यांच्याशी शारिरीक संबंध निर्माण केले. पण, दुसऱ्या मुलीशी साखरपुडा केला. दरम्यान, शुभमच्या भावानेच तरुणीला शुभमशी लग्न करायचे असेल तर ५ लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यानंतर तरुणी शुभमच्या घरी गेली व प्रेमसंबंधाची माहिती दिली असता शुभमच्या भावाने शिवीगाळ करून मारहाण केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.