मैत्रिणीवरच ब्लॉकमेल करून लैगिंक अत्याचार, पुण्यातील धक्कादायक प्रकार; आरोपीवर गुन्हा दाखल

लहानपणापासून मित्र असलेल्या तरुणाने मैत्रीचा गैरफायदा घेत दोघांचे एकत्र असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

    पुणे : लहानपणापासून मित्र असलेल्या तरुणाने मैत्रीचा गैरफायदा घेत दोघांचे एकत्र असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात आसिफ रहीम शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २६ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. जुलै २०२२ ते १३ डिसेंबर २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी आसिफ हे लहानपणीचे मित्र आहेत. ते चांगले मित्र असल्याने त्यांचे काही एकत्र फोटो देखील होते. तेव्हा आसिफने हे फोटो व्हायरल करून तुझी बदनामी करण्याची धमकी देऊन ब्लॉकमेल केला. तसेच, तुझ्या मामाला ठार मारेल अशी धमकी देऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शरीर संबंध केले. तरुणीला ब्लॉकमेल करत असल्याने तिने शेवटी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.