घरफोड्या करणाऱ्या चोरट्याला बेड्या, ४ गुन्ह्यांची उकल; गुन्हे शाखेच्या युनिट पाचची कारवाई

घरफोड्या करून त्यातील सोने विक्रीसाठी आलेल्या एका चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिट पाचने बेड्या ठोकल्या आहेत. कोंढवा भागातून त्याला पकडण्यात आले.

    पुणे : घरफोड्या करून त्यातील सोने विक्रीसाठी आलेल्या एका चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिट पाचने बेड्या ठोकल्या आहेत. कोंढवा भागातून त्याला पकडण्यात आले असून, त्याच्याकडून ४ गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, पावणे चार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

    दानिश मकबुल शेख (वय २६ रा. गल्ली नंबर १२, धम्मदिप चौक, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून कोंढ‌वा पोलीस ठाण्यात ४ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.

    ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी, उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, पोलीस अमलदार रमेश साबळे, राजस शेख, पृथ्वीराज पांडूळे, पल्लवी मोरे यांनी केली आहे.

    शहरातील वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांना सचूना देण्यात आल्या आहेत. यावेळी पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीत गस्त घालत होते. तेव्हा सोमजी चौकात बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक व्यक्ती घरफोड्या करून चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी विठ्ठल मंदिराजवळ कोंढवा खुर्द पुणे येथे थांबलेला आहे. या माहितीची खातरजमा करून पथकाने सापळा रचून दानिश शेख याला पकडले. त्याची अंगाझडती घेतली असता त्याचे खिशात ३ लाख ७८ हजार रुपयांचे ७३ ग्रॅम सोन्याचे दागीने व एक मोबाईल मिळुन आला. याबाबत चौकशी केली त्याने काकडेवस्ती, लक्ष्मीनगर, डी मार्ट या परिसरात घरफोड्या केल्याचे कबूल केले.