पोलिसांनी केली शाहरुख खानला अटक; अधिकाऱ्यांचे बनावट अकाऊंट बनवून नागरिकांची करायचा फसवणूक

शासकीय अधिकाऱ्यांचे बनावट अकाउंट बनवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या शाहरुख खानला पुणे पोलीसांनी अटक केली आहे. पुणे सायबर पोलिसांनी आरोपीला केली राजस्थान मधून अटक केली आहे.

    पुणे : शासकीय अधिकाऱ्यांचे बनावट अकाउंट बनवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या शाहरुख खानला पुणे पोलीसांनी अटक केली आहे. पुणे सायबर पोलिसांनी आरोपीला केली राजस्थान मधून अटक केली आहे.

    संबंधित आरोपीने पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या सह देशातील इतर शासकीय अधिकाऱ्यांच्या नावाने बोगस फेसबुक अकाउंट तयार केले होते. याच बरोबर एका पत्रकाराकडून ७० हजार रुपये उकळले होते.

    अधिक माहिती अशी की, फिर्यादीने सायबर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली होती. यावेळी फिर्यादी यांना पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नावाने फेसबुक रिक्वेस्ट आली. राजेश देशमुख बोलत असल्याचे भासवून त्यांचा मित्र संतोष कुमार, सीआरपीएफ मध्ये कार्यरत असून, त्यांचे जुने फर्निचर कमी किमतीत विकत असल्याचे सांगितले.

    फिर्यादी यांचा विश्वास संपादन झाल्यानंतर आरोपी ने जुने फर्निचर विकत घेण्यासाठी ७०,००० रुपये ट्रान्सफर करण्यास सांगीतले. फिर्यादी यांनी रक्कम आरोपीने दिलेल्या बँक अकाऊंटवर ट्रान्स्फर करुन फर्निचर पाठविले नाही आणि हे सगळं प्रकरण बोगस आहे असे कळताच फिर्यादी यांनी पोलीस ठाणे गाठले.

    पोलीसांनी शाहरुकची चौकशी असता आशी माहीती मिळाली की, त्याने देशातील अनेक आयपीएस आणि आयएएस अधिकार्यांचे बनावट प्रोफाइल फेसबुक वर बनवून लाखो रुपये उकळले आहेत. आधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.