राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या सचिवपदी शाम थोरात

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र सचिवपदी शाम थोरात (Sham Thorat) यांची निवड करण्यात आली. सांगली येथे झालेल्या बैठकीत ही निवड झाली. संघटनेने आजपर्यंतच्या त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

    बार्शी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र सचिवपदी शाम थोरात (Sham Thorat) यांची निवड करण्यात आली. सांगली येथे झालेल्या बैठकीत ही निवड झाली. संघटनेने आजपर्यंतच्या त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

    राज्यातील वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाची पुणे, नगर, सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर या विभागासाठी केंद्रीय व्यवस्थापन समितीचे सदस्यपदी विकास सूर्यवंशी, (सांगली), उपाध्यक्षपदी रघुनाथ कांबळे, (कोल्हापूर), सचिवपदी शाम थोरात (बार्शी) या सर्वांची बिनविरोध निवड करण्यात आली.

    पश्चिम महाराष्ट्रात सुमारे नऊ हजार सदस्य असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून विविध प्रश्नांना वाचा फोडून ते निकाली काढण्याचे काम मागील पंधरा वर्षांपासून सुरू आहे. लवकरच इतरही कार्यकारिणी सदस्य निवडले केली जाईल असल्याची माहिती नूतन सचिव शाम थोरात यांनी दिली.

    यावेळी पश्चिम महाराष्ट्रतील गोरख भिलारे, राजेंद्र माळी (सातारा), गणेश पवार (सातारा), सचिन चोपडे (सांगली), अण्णासाहेब गुंडे (कोल्हापूर), बार्शीचे सचिन उपस्थित होते.