
पुणे : शेपिंग चॅम्पियन्स फाऊंडेशनने सोमवारी पुण्यातील जागतिक दर्जाच्या स्पर्धांच्या जाहिरातीद्वारे पुण्यातील खेळाडू, पालक आणि अकादमींना सक्षम बनविणाऱ्या शेपिंग चॅम्पियन्स फाऊंडेशनच्या बोधचिन्हाचे अनावरण केले.
कोर्टवर आणि बाहेर विजेते बनविण्याचे शेपिंग चॅम्पियनचे ध्येय्य
सारिका गडदे, केतकी जोगळेकर आणि सोनाली देशमुख या शेपिंग चॅम्पियन्स फाऊंडेशनच्या संचालक आहेत. शहारातील प्रत्येक टेनिसपटू उच्चा दर्जाचे प्रशिक्षण घेण्यास आणि त्याला स्पर्धा संधी मिळविण्यास पात्र आहे. यासाठीच ते पुण्यातील जागतिक दर्जाच्या टेनिस स्पर्धांना प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित आहेत. यासाठीच खिलाडूवृत्ती, सांघिक कार्य आणि निष्पक्ष खेळा महत्व देताना प्रत्येकाला कोर्टवर आणि बाहेर विजेते बनविण्याचे शेपिंग चॅम्पियनचे ध्येय्य आहे. यावेळी आशिष जोगळेकर, राजेश गडदे, डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव अश्माविन गिरमे आदी मान्यवर उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय टेनिस प्रशिक्षक हेमंत बेंद्रे हस्ते अनावरण
पुण्याचे आंतरराष्ट्रीय टेनिस प्रशिक्षक हेमंत बेंद्रे हस्ते या शेपिंग चॅम्पियन्स फाऊंडेशनच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. या संस्थेच्या माध्यमातून पु्ण्यातील टेनिस संस्कृती आणखी वाढताना दिसेल असा मला विश्वास वाटतो. त्यामुळे फाऊंडेशनच्या लोगोचे अनावरण करताना मला आनंद होत आहे, असे हेमंत बेंद्रे म्हणाले.
आम्ही अनेक वर्षांमध्ये अनेक विजेते खेळाडू तयार केले आहेत. आता शेपिंग फाउंडेशनच्या पाठिंब्याने आम्ही आणखी अनेक चॅम्पियन्स उदयास येताना पाही, असेही ते पुढे म्हणाले.
या संस्थेचे मार्गदर्शक म्हणून काम पाहणार
शहरातील प्रसिद्ध टेनिस प्रशिक्षक हेमंत बेंद्रे या संस्थेचे मार्गदर्शन म्हणून काम पाहणार आहेत. शेपिंग चॅम्पियन्सचे उद्दिष्ट टेनिसपटूंसाठी संधी निर्माण करणे हे असून, त्यांनी गेल्या दोन वर्षांत केलेले काम प्रभावी आहे. यासाठी मी त्यांना हे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करु इच्छितो, असेही मोहोळ यांनी सांगितले.
शेपिंग चॅम्पियन्स वचनबद्ध
शेपिंग फाऊंडेशनने सुरुवातीला सध्या अडचणीच्या क्षेत्राची निवड केली आहे. पुण्यात एआयटीए स्पर्धा होत नसल्यापासून याची सुरुवात होते. यामुळे खेळाडूंना स्पर्धात्मक स्पर्धांसाठी उच्च खर्चावर प्रवास करणे, प्रशिक्षण, तंदुरुस्तीसाठी होणारा वेळेचा अभाव आणि दुखापतीचा धोका निर्माण होतो. अशा वेळी खेळाडूंना कौंटुबिक सहायतेची कमतरता भासते. शैक्षणिक क्षेत्रातील अज्ञानही वाढू शकते. याच अडचणीवर मात करण्यासाठी शेपिंग चॅम्पियन्स फाऊंडेशनने उपाय शोधले आहे आणि अधिक स्पर्धा आयोजित करण्यासाठी शेपिंग चॅम्पियन्स वचनबद्ध राहणार आहे.
पुणे हे शहर तसे किफायतशीर आहे. खेळाडूंना त्यांच्या प्रशिक्षण आणि पुनर्प्राप्तीसाठी अधिक चांगले नियोजन करुन दुखापतीचा धोका कमी करु शकतात. यामुळे वाचवलेला वेळ कौटुंबिक आणि शिक्षणासाठी वापरला जाऊ शकतो. याचा खेळाडूंवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.