
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे किती आमदार आहेत, याचा आकडा गुलदस्त्यात होता. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आटोपल्यानंतरदेखील या विषयावर चर्चा रंगली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नसल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे शरद पवार यांनी केला होता.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे किती आमदार आहेत, याचा आकडा गुलदस्त्यात होता. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आटोपल्यानंतरदेखील या विषयावर चर्चा रंगली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नसल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे शरद पवार यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर कोणाकडे किती आमदार आहेत, याबाबत उत्सुकता ताणली गेली होती. मात्र, आता निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या उत्तरातून गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.
शरद पवार गटाकडे केवळ 12 आमदार उरले असल्याचे स्पष्ट झाले आहे, तर अजित पवार यांच्याकडे असलेल्या आमदारांची संख्या दोन तृतीयांशपेक्षाही अधिक आहे. कारागृहातून नुकतीच सुटका झालेले नवाब मलिक तटस्थ आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना त्यांचे 56 आमदार होते.
अजित पवारांकडे ते स्वत: छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अनिल भाईदास पाटील, संजय बनसोडे, अदिती तटकरे, धर्मराव आत्राम, मनोहर चंद्रिकापुरे, इंद्रनील नाईक, राजू कारेमोरे, नितीन पवार, माणिक कोकाटे, दिलीप बनकर, मनोज अहिरे, दौलत दरोडा, दिलीप मोहिते, सुनील शेळके, किरण लहामाटे, अण्णा बनसोडे, संग्राम जगताप, प्रकाश सोळंके, बाळासाहेब आसबे, बाबासाहेब पाटील, शेखर निकम, नरहरी झिरवाळ, बबन शिंदे, दीपक चव्हाण, मानसिंग नाईक, अतुल शेळके, चेतन तुपे, आशुतोष काळे, मकरंद पाटील, नीलेश लंके यशवंत माने, दत्तात्रय भरणे, सुनील टिंगरे, राजू नवघरे, राजेंद्र शिंगणे या आमदारांचा समावेश आहे.
शरद पवारांकडील आमदार
जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, सुनील भुसारा, सुमन पाटील, अशोक पवार, प्राजक्त तनपुरे, बाळासाहेब पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, संदीप क्षीरसागर यांचा समावेश आहे.