
भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, राज्यातले उद्योग यांनी बाहेर काढले, नानारला विरोध केला , नवीन विमानतळाला विरोध करणारे तुम्ही आहेत. राज्याचा जीव उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने घेतला.
मुंबई :भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, राज्यातले उद्योग यांनी बाहेर काढले, नानारला विरोध केला , नवीन विमानतळाला विरोध करणारे तुम्ही आहेत. राज्याचा जीव उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने घेतला. महाराष्ट्र आजही गुंतवणुकीत नंबर वन आहे, अशा शब्दात आशिष शेलार यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. आशिष शेलार म्हणाले, पत्राचाळ घोटाळा करून आमचा पक्ष चालत नाही. कोविड खिचडी घोटाळा करून आमचा पक्ष चालत नाही. आम्ही आमच्या पक्षाच्या खर्चाचा हिशेब निवडणूक आयोगाकडे देत असतो.
मतांसाठी राजकारण सुरू
आशिष शेलार म्हणाले, विशिष्ट वर्गाची मते मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शंका उपस्थित करणाऱ्यांना इतिहास नको, वापरलेली वाघ नख नको हे सर्व नियोजित आहे. महाराष्ट्राची जनता पाहत आहे. आजही मोहमद अली रोडवर बोर्ड आहेत त्यावर कुणी काळे फासत नाही. आज गुजराती शब्दावर तोडफोड करत आहेत. आमचे आव्हान आहे मोहमद अली रोडवर जे उर्दू आणि पारशी बोर्ड आहेत ते तोडफोड करून दाखवा, असेल आव्हान त्यांनी दिले.