‘महाराष्ट्राच्या राजकारणात पवार, ठाकरेच राहतील’; संजय राऊत यांचं विधान

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे अजित पवार गटाला 2024 च्या निवडणुकीत माती चारतील, असे विधान खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. 'कुणी कितीही निष्ठेच्या गप्पा मारत असले तरी खरी निष्ठा काय असते ते उद्धव ठाकरे व शरद पवारांचे खंदे कार्यकर्ते दाखवून देतील', असे राऊत म्हणाले.

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे अजित पवार गटाला 2024 च्या निवडणुकीत माती चारतील, असे विधान खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. ‘कुणी कितीही निष्ठेच्या गप्पा मारत असले तरी खरी निष्ठा काय असते ते उद्धव ठाकरे व शरद पवारांचे खंदे कार्यकर्ते दाखवून देतील’, असे राऊत म्हणाले.

    मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘महाराष्ट्राला, मराठी माणसाला सामान्यांना स्वातंत्र्य राहण्याचा मंत्र दिला त्या पक्षाशी निष्ठा ठेवणे हे महाराष्ट्रावर निष्ठा ठेवण्यासारखी आहे, असं मी मानतो. त्यामुळे सत्ता येते. सत्ता जाते पण संकट आलं म्हणून बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांना महाराष्ट्रात स्थान नाहीर, असंही राऊतांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात 2024 नंतर दोनच चेहरे राहतील. एक म्हणजे शरद पवार आणि दुसरे उद्धव ठाकरे’,

    दरम्यान, आज संजय राऊत यांचा वाढदिवस असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान, राऊतांनी सुषमा अंधारेंचे कौतुक केले आहे. शरद पवार संकटाला सामोरे जात खंबीर उभे राहत आहेत. राजकारणामध्ये निष्ठेला महत्त्व