नैना प्रकल्प बाधितांच्या न्याय मागण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार, शरद पवार यांचे आश्वासन

साडेबारा टक्के योजनेमार्फत प्राप्त भूखंड मधून बेकायदेशीर कपात पाऊने चार टक्के भूखंड शेतकऱ्यांना परत करावेत.

    पनवेल, ग्रामीण : सिडकोकडून राबविण्यात येत असलेला नैना प्रकल्प रद्द करण्यासाठी तसेच पनवेल उरण नवी मुंबईतील भूमिपुत्रांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी बांधलेली रहिवासी, वाणिज्य वापरातील बांधकामे जेथे आहेत तेथे नियमित करावी. साडेबारा टक्के योजनेमार्फत प्राप्त भूखंड मधून बेकायदेशीर कपात पाऊने चार टक्के भूखंड शेतकऱ्यांना परत करावेत. विरार अलिबाग कॉरिडॉर, लॉजिस्टि्स पार्क, महाऊर्जा प्रकल्प इत्यादी महत्वाच्या मागण्या संदर्भात ९५ गाव नवी मुंबई, नैना आणि इतर प्रकल्पग्रस्त समितीच्या सदस्यांनी सोमवारी ( ता.२७) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत निवेदन सादर केले.

    या वेळी समितीचे अध्यक्ष ॲड सुरेश ठाकुर, प्रशांत पाटील ( राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेते) अनिल ढवळे ( माजी सरपंच शिवकर) रवींद्र भगत ( माजी नगरसेवक) ॲड मदन गोवारी (सरचिटणीस) अतुल म्हात्रे (वास्तुविशाद)उपस्थित होते. या वेळी नैना प्रकल्प, गरजेपोटी घरे नियमित करणे व इतर मागण्या संधर्भात लवकरच मुख्यमत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात बाबत शरद पवार यांनी समितीस आश्वासन देवून नैना प्रकल्प विरोधात ६ डिसेंबर पासून आयोजित शेतकऱ्यांच्या उपोषणास सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती समिती चे सरचिटणीस ॲड मदन गोवारी यांनी दिली आहे.